रोपवाटिकांमध्ये सणासुदीतच लगीनघाई; भाजीपाला रोपांच्या मागणीत वाढ 
मुख्य बातम्या

रोपवाटिकांमध्ये सणासुदीतच लगीनघाई; भाजीपाला रोपांच्या मागणीत वाढ

महाराष्ट्रातील रोपवाटिकांमध्ये ऐन सणासुदीतच लगीनघाई सुरू झाली आहे. अनेक शेतकऱ्यांना आता रोपांच्या मागणीसाठी वाट पाहावी लागत आहे.मागणीदुपटीने वाढली आहे.

Raj Chougule

कोल्हापूर : ऑक्‍टोबरमध्ये दैना केलेल्या पावसाचे सकारात्मक परिणाम आता भाजीपाल्याच्या लागवडीवर होत आहे. पंधरा दिवसांपासून राज्यात सर्वत्र पाऊस थांबल्याने वाफसा जलद येत आहे. यामुळे शेतकरी भाजीपाल्याच्या लागवडीकडे वळत आहे. सध्या भाजीपाल्याचे दर चांगले असल्याने भाजीपाल्याला लागवडीला पसंती दिली जात आहे. यामुळे कोरोनाच्या काळात सहा महिने शांतता अनुभवणाऱ्या पश्‍चिम महाराष्ट्रातील रोपवाटिकांमध्ये ऐन सणासुदीतच लगीनघाई सुरू झाली आहे. अनेक शेतकऱ्यांना आता रोपांच्या मागणीसाठी वाट पाहावी लागत आहे. बहुतांशी प्रमुख भाजीपाल्याच्या रोपांची मागणी गेल्या पंधरा दिवसांपासून दुपटीने वाढली आहे. राज्यातील विविध भागांत पश्‍चिम महाराष्ट्रातील रोपवाटिकांमधून रोपांची विक्री होते. कोरोनाचे संकट सुरू झाल्यापासून भाजीपाला उत्पादक सातत्याने नुकसानीत येत आहे. यामुळे रोपवाटिकांमधूनही मागणी मोठ्या प्रमाणात घटली होती. भाजीपाल्याला दर नसल्याने शेतकऱ्यांनी भाजीपाल्याची लागवड घटविली. सप्टेंबरपासून भाजीपाल्याची चणचण भासत असतानाच ऑक्टोबरमध्ये अवकाळीच्या तडाख्याने उपलब्ध असणारा भाजीपाल्याचेही मोठे नुकसान झाले. यामुळे ऑक्टोबरच्या शेवटच्या सप्ताहापासून बहुतांशी भाजीपाल्याचे दर विक्रमी पातळीवर पोचले. याचा चांगला परिणाम शेतकऱ्यांच्या भाजीपाला लागवड करण्याच्या मानसिकतेवर झाला. जोरदार पावसाने नुकसान झाले असले तरी दुष्काळी पट्ट्यातील विहिरी, कूपनलिका आदी स्रोत मजबूत झाले. पाण्याची उपलब्धता वाढल्याने या पट्ट्यातील शेतकरीही भाजीपाला पीक घेण्याकडे वळत आहे. यामुळे भाजीपाला रोपांच्या मागणीत मोठी वाढ दिसून येत असल्याचे रोपवाटिकाचालकांनी सांगितले. सध्या टोमॅटो, फ्लॉवर, ढोबळी मिरची, वांगी, दोडका, कोबी आदी भाजीपाल्यांच्या रोपांना शेतकऱ्यांकडून जास्त मागणी आहे. यामुळे ॲडव्हान्स घेऊन रोपांचा पुरवठा करण्याचे नियोजन रोपवाटिकाचालक करीत आहेत. पुढील पंधरा दिवसांचे रोपांचे बुकिंग करून त्या दृष्टीनेच रोपे तयार करण्यात येत असल्याचे रोपवाटिकाचालकांनी सांगितले.

प्रतिक्रिया... कोविड संकटानंतर पहिल्यांदाच आम्ही रोपांच्या मागणीतील वाढ अनुभवत आहोत. राज्यात ज्या ठिकाणी दुष्काळ असतो. तेथेही शेतकरी भाजीपाला लागवडीस प्राधान्य देत असल्याचे चित्र आहे. परिणामी, भाजीपाला पट्ट्यातील शेतकऱ्यांबरोबर दुष्काळी भागातील शेतकरीही भाजीपाला रोपांची मागणी करीत आहेत. मागणी इतकी रोपे देणे आम्हाला कठीण होत आहे. - शिवाजीराव कचरे, रोपवाटिका चालक, तमलदगे, जि. कोल्हापूर   

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast: सोयाबीनच्या दरात घसरण, हरभरा दरात घसरण, टोमॅटो दरात चढ-उतार, पालक आवकेत वाढ तर डाळिंबाच्या दरात बदल

Government Assistance: शेतकरी आत्महत्येची आठ प्रकरणे मदतीसाठी पात्र

Marathwada Rain Deficit: मराठवाड्यात पावसाच्या तुटीमुळे पेरणी क्षेत्रात ७ टक्क्यांची घट

Buldhana DCC Bank: बुलडाणा जिल्हा बँकेवर सहकार पॅनेलचे वर्चस्व

Maharashtra Rain Alert: राज्यात १० जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट; दोन दिवस पावसाचा अंदाज

SCROLL FOR NEXT