संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र 
मुख्य बातम्या

पूर्वहंगामी द्राक्ष बागांना पीकविम्याचे संरक्षण द्या  : आमदार दिपीका चव्हाण

टीम अॅग्रोवन

नाशिक  : बागलाण तालुक्यात अतिवृष्टीमुळे सर्वच पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. त्यात झालेल्या मॉन्सूनोत्तर पावसाने पूर्वहंगामी द्राक्षांची अतोनात हानी झाली आहे. अशा परिस्थितीत नुकसानीची पाहणी करून शासनाकडे प्रस्ताव सादर करावा, अशी सूचना प्रशासनाला दिली आहे. यासह तालुक्यातील पूर्वहंगामी द्राक्षांना पीकविम्याचे संरक्षण नसल्यामुळे प्रयोगशील शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान होते. आगामी काळात हंगामपूर्व द्राक्षांना पीकविम्याचे संरक्षण मिळावे, अशी मागणी आमदार दीपिका चव्हाण यांनी केली आहे.            

गेल्या पाच-सहा वर्षांपासून सातत्याने अत्यल्प पर्जन्यमान राहिलेल्या बागलाण तालुक्यात यावर्षी मात्र समाधानकारक पाऊस झाला आहे. परंतु, अतिवृष्टी आणि प्रतिकूल हवामानामुळे तालुक्‍यातील सर्वच पिकांना झळ बसली आहे. प्रामुख्याने पूर्वहंगामी द्राक्ष उत्पादनाला यावर्षी कोट्यवधी रुपयांचा फटका बसला आहे. बागलाण तालुक्यात मोठ्या प्रमाणात पूर्वहंगामी द्राक्षाचे उत्पादन घेतले जाते. पावसाळ्यात बागा धरून नोव्हेंबर डिसेंबरच्या सुमारास आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत द्राक्ष दाखल होतात. परंतु, चालू वर्षी जोरदार पाऊस झाल्याने द्राक्ष उत्पादन सुरवातीपासूनच बाधित झाले. तालुक्‍यातील प्रयोगशील शेतकऱ्यांनी द्राक्ष उत्पादनासाठी प्रयत्नांची पराकाष्टा केली. परंतु, आता वादळी वारा आणि पावसामुळे द्राक्ष बागांचे अतोनात नुकसान झाले आहे. पूर्वहंगामी द्राक्ष बागांच्या नुकसानीची पाहणी करून शासनास तातडीने प्रस्ताव सादर करण्यात यावा, अशी प्रशासनाला सूचना देण्यात आल्याची माहिती आमदार चव्हाण यांनी दिली. 

पावसाळ्यात घेतल्या जाणाऱ्या द्राक्ष उत्पादनावर हवामानाचा मोठ्या प्रमाणात परिणाम होतो, त्यामुळे पूर्वहंगामी द्राक्षालाही पीकविमा लागू केल्यास शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान भरून निघण्यास मदत होईल. याबाबत शासनस्तरावर अधिक पाठपुरावा करण्यात येईल, असे आमदार चव्हाण यांनी सांगितले. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Accident Insurance Scheme : अपघात विमा योजनेतून ४५० शेतकरी कुटुंबांना मदत

Banana Sunburn : उन्हाच्या तीव्रतेमुळे जळताहेत केळीची रोपे

Summer Heat : मालेगावात वैशाखाआधीच वणवा

Adulterated Milk : भेसळयुक्त दूध रोखण्यासाठी उपाययोजना कराव्यात

Water Scarcity : कळंबा परिसरात पाण्याचा प्रश्‍न गंभीर

SCROLL FOR NEXT