नुकसानभरपाईच्या मागणीसाठी आंदोलन करताना `स्वाभिमानी`चे कार्यकर्ते
नुकसानभरपाईच्या मागणीसाठी आंदोलन करताना `स्वाभिमानी`चे कार्यकर्ते 
मुख्य बातम्या

संत्रा, मोसंबी उत्पादकांना हेक्टरी एक लाख रुपये नुकसानभरपाई द्या

टीम अॅग्रोवन

अमरावती : जिल्ह्यातील तापमान, पाणीटंचाई आणि दुष्काळामुळे वाळलेल्या संत्रा, मोसंबी बागांचे सर्व्हेक्षण करून पंचनामे करावेत आणि हेक्टरी एक लाख रुपयांची नुकसानभरपाई देण्यात यावी, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे विदर्भ अध्यक्ष देवेंद्र भुयार यांनी केली. वरुड उपविभागीय अधिकाऱ्यांच्या कक्षात या मागणीच्या पूर्ततेसाठी ठिय्या आंदोलनही करण्यात आले. वाळलेल्या संत्रा बागांच्या नुकसानभरपाईबाबत धोरणात्मक निर्णय न घेतल्यास यापुढील काळात तीव्र आंदोलनाचा इशाराही या वेळी देण्यात आला.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या मागणीनुसार, वरुड आणि मोर्शी या दोन तालुक्यांत ३४,००० हेक्‍टरवर नागपुरी संत्रा लागवड आहे. दर्जेदार फलोत्पादनाच्या उद्देशाने शेतकरी उत्तम प्रतीच्या निविष्ठा या पिकांसाठी वापरतात. त्यावर त्यांचा दरवर्षी लाखो रुपयांचा एकरी खर्च होतो; परंतु गेल्या सहा महिन्यांपासून या भागात पाण्याची पातळी सातत्याने खालावत आहे. त्यामुळे या भागातील जलस्रोत कोरडे पडले आहेत. संत्रा झाडे जगविण्याचे मोठे आव्हान या भागातील शेतकऱ्यांसमोर आहे. दोन तालुक्‍यांत सुमारे २५ हजार हेक्‍टरवरील संत्रा झाडे तीव्र पाणीटंचाई व दुष्काळामुळे जळाली आहेत. या बागा शेतकरी तोडून टाकत आहेत.

खरीप हंगाम सुरू असताना हे सारे घडत आहे. त्यानंतरसुद्धा या गंभीर प्रश्‍नाकडे लक्ष देण्यासाठी प्रशासनाला वेळ नाही. त्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेने उपविभागीय अधिकाऱ्यांच्या कक्षात ठिय्या दिला. त्याची दखल घेत २०१८-१९ या वर्षात निर्माण झालेल्या फळपिकांचा प्राथमिक नजर अंदाज अहवाल तत्काळ दाखल करण्याचे आदेश उपविभागीय अधिकाऱ्यांनी काढले. आंदोलनात ऋषीकेश राऊत, राहुल टाके, पंकज शेळके, शुभम तिडके, कपिल परिहार, किशोर चंबोळे, अर्जुन दाभाडे व इतर सहभागी झाले होते. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Climate Change : हवामान बदलाचा फळबागेला जोरदार फटका

Indian Politics : गांधींचा वारसा, मोदींचा आरसा

Delhi Farmers' protest : शेतकरी आंदोलनाचा थर्मल प्लांटला फटका; कोळसा पुरवठा बंद, अनेक रेल्वे गाड्या रद्द

Devgad Hapus : बॉक्स देवगड हापूसचा पण आंबा कर्नाटकचा, ग्राहकांची उघड लूट

Market Trend : बाजारकलासाठी हवामान, नवीन सरकारकडे लक्ष

SCROLL FOR NEXT