Debt collection from private banks continues in Nagar district 
मुख्य बातम्या

नगर जिल्ह्यात खासगी बँकांकडून कर्ज वसुली सुरूच

नगर : कोरोनामुळे आर्थिक घडी बिघडलेली असल्याने शेतकऱ्यांकडून ३१ ऑगस्टपर्यंत कुठल्याही पीककर्जाची वसुली करू नये, असे आदेश असले तरी हा आदेश फक्त जिल्हा बँकेनेच काढला असून राष्ट्रीयीकृत व खासगी बँकांकडून मात्र कर्जाची वसुली केली जात असल्याच्या तक्रारी येत आहेत.

टीम अॅग्रोवन

नगर : कोरोनामुळे आर्थिक घडी बिघडलेली असल्याने शेतकऱ्यांकडून ३१ ऑगस्टपर्यंत कुठल्याही पीककर्जाची वसुली करू नये, असे आदेश असले तरी हा आदेश फक्त जिल्हा बँकेनेच काढला असून राष्ट्रीयीकृत व खासगी बँकांकडून मात्र कर्जाची वसुली केली जात असल्याच्या तक्रारी येत आहेत. वसुली थांबवण्याबाबत अजून वरिष्ठांचे कुठलेही आदेश नाहीत, असे बँकांचे अधिकारी सांगत आहेत. आधीच आर्थिक अडचणीत असलेले शेतकरी मात्र यामुळे त्रस्त झाले आहेत.

गेल्या अडीच महिन्यांपासून लाॅकडाउन आहे. त्याचा गंभीर परिणाम शेती आणि शेतकरी जीवनावर झालेला आहे. शेतमाल विक्री करता येत नाही, कांदा घरात पडून आहे, नवीन पीककर्ज लवकर मिळत नाही. सापडलेल्या शेतकऱ्यांची अर्थव्यवस्था बिघडली असल्यामुळे ३१ आॅगस्टपर्यंत शेतकऱ्यांकडून कोणत्याही पीककर्जाची वसुली करू नये, असे आदेश देण्यात आलेले आहेत. मात्र, नगर जिल्ह्यात फक्त जिल्हा बँकेनेच आदेशाची अंमलबजावणी करत कुठल्याही शेतकऱ्यांची ३१ ऑगस्टपर्यंत वसुली करू नये, असे जिल्हा बँकेने सर्व सोसायट्यांना आदेश दिले असल्याचे जिल्हा उपनिबंधक दिग्विजय आहेर यांनी सांगितले.

सहकारी आणि राष्ट्रीयीकृत बँकांचे सर्व नियम वेगवेगळे असून राष्ट्रीयीकृत व खासगी बँकांना अजून कर्ज वसुलीत थांबवण्याबाबत कुठलेही आदेश नाहीत अग्रणी बँकेकडून सांगण्यात आले. यामुळे आर्थिक कोंडीत सापडलेल्या शेतकऱ्यांकडून कर्ज वसुली केली जात असल्याने नगर जिल्ह्यातील शेतकरी मात्र त्रस्त झाले आहेत.

जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश काढावेत नगर जिल्ह्यामध्ये कोरोनामुळे शेतकरी अडचणीत असून, जिल्हा बँकेने कर्जवसुली थांबलेली असली तरी आणि खासगी बँकांकडून होत असलेली कर्जवसुली हा परीक्षा पाहणारा प्रकार आहे. कोणत्याही बँकेकडून कर्ज वसुली होऊ नये, असे आदेश तातडीने जिल्हाधिकाऱ्यांनी काढावेत. कारवाई झाली नाही तर रस्त्यावर उतरून आंदोलन करू, असे शेतकरी मराठा महासंघाचे प्रदेशाध्यक्ष संभाजी दहातोंडे पाटील यांनी सांगितले.

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने कर्ज वसुली करू नये, याबाबत आदेश काढले आहेत. त्यामुळे ३१ आॅगस्टपर्यंत शेतकऱ्यांकडून कर्ज वसुली होणार नाही.   - दिग्विजय आहेर, जिल्हा उपनिबंधक, नगर

राष्ट्रीयीकृत व खासगी बँकांकडून कर्जवसुली थाबवण्याबाबत अजून वरिष्ठांकडून कुठल्याही प्रकारचे आदेश नाहीत. त्यामुळे कर्जवसुली होत असेल. याबाबत वरिष्ठांशी बोलणार आहे. - श्री. संदीप वालावलकर, जिल्हा व्यवस्थापक, अग्रणी बॅंक, नगर

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer ID: फार्मर आयडीच्या गोंधळाचा शेतकऱ्यांना फटका

Adulteration Issue: दूध, अन्नभेसळ टाळण्यासाठी देशी गोपालन कार्यक्रमांची गरज

Agri Diploma Jobs: कृषी पदविकाधारकांना नोकर भरतीत न्याय देणार; कृषिमंत्री कोकाटे

Banana Harvest: खानदेशात आगाप कांदेबाग केळीच्या काढणीला सुरुवात

India China Relation: भारत-चीनमध्ये हवा खुला संवाद : एस. जयशंकर

SCROLL FOR NEXT