व्यापारी, अडत्यांचे लायसन्स रद्द करा ः सहकारमंत्री देशमुख
व्यापारी, अडत्यांचे लायसन्स रद्द करा ः सहकारमंत्री देशमुख 
मुख्य बातम्या

व्यापारी, अडत्यांचे लायसन्स रद्द करा ः सहकारमंत्री देशमुख

टीम अॅग्रोवन

लातूर ः शेतकऱ्यांनी हमी भावापेक्षा कमी भावाने शेतमाल विकू नये, तसेच हमी भावापेक्षा कमी दराने व्यापाऱ्यांनी माल खरेदी करू नये. तसे केल्यास त्या व्यापारी व अडत्यांवर त्यांचे लायसन्स रद्द करण्याची कारवाई बाजार समित्यांनी करावी, असे निर्देश सहकार व पणनमंत्री सुभाष देशमुख यांनी दिले आहेत.

येथे गुरुवारी झालेल्या लातूर विभागाच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. या वेळी सहकार विभागाचे विभागीय सहनिबंधक एस. एस. देशमुख, वखार महामंडळाचे प्रादेशिक व्यवस्थापक श्री. गण, लातूरचे उपजिल्हा निबंधक समृत जाधव, उस्मानाबादचे विश्वास देशमुख, बीडचे शिवाजी बडे व नांदेडचे प्रवीण फडणवीस, लातूर बाजार समितीचे सभापती ललित शहा, पणन मंडळाच्या विभागीय व्यवस्थापक शुभांगी गौंड, जिल्हा मार्केटिंग अधिकारी लटपटे उपस्थित होते.

राज्यातील सर्व बाजार समित्यांनी शेतमाल तारण योजनेची प्रभावी अंमलबजावणी करावी. या करीता शासन मागील दोन वर्षांपासून सातत्याने पाठपुरावा करत आहे. परंतु बाजार समित्या व व्यापारी यांचे संगनमत असल्याने बहुतांश बाजार समित्यांनी ही योजना सुरू केलेली नाही. अशा सर्व बाजार समित्यांवर कठोर कारवाई करण्याचा इशारा सहकार, पणन व वस्त्रोद्योगमंत्री सुभाष देशमुख यांनी येथे दिला.

यावर्षी हमीभाव खरेदी केंद्र ही गोदाम जवळ असलेल्या ठिकाणीच देण्यात येणार आहेत. आधारभूत किंमत योजनेंतर्गत केंद्र व शेतकऱ्यांची संख्या अत्यंत कमी असून ही संख्या अधिक वाढवावी. या योजनेअंतर्गत मागील वर्षीचे शेतकऱ्यांचे पेमेंट ही लवकरच देण्यात येणार आहे, असेही सहकारमंत्री देशमुख यांनी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Tata Tea : ‘टाटा टी’कडून शेतकऱ्यांनी काय शिकायला हवे?

Indian Politics : पतंग, रेवड्या आणि वास्तव

Cotton Market : कापूस का काळवंडला?

Agriculture Commodity : मक्याच्या दरात घसरण; हळदीची पुन्हा उसळी

Kolhapur Market Rate : कोंथिबीर, पालेभाज्या २० रुपये पेंढी उष्म्यामुळे भाजी मंडईत आवक घटली

SCROLL FOR NEXT