नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या  मदतीसाठी लोकप्रतिनिधींचे मौन  Of damaged farmers The silence of the people's representatives for help
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या  मदतीसाठी लोकप्रतिनिधींचे मौन  Of damaged farmers The silence of the people's representatives for help 
मुख्य बातम्या

यवतमाळ :नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या  मदतीसाठी लोकप्रतिनिधींचे मौन 

टीम अॅग्रोवन

आर्णी, यवतमाळ : परतीच्या पावसाने खरीप पिकांची नासाडी झाली. पावसाने शेतीची दाणादाण केली असल्याने शेतकरी निःशब्द झाला आहे. शेतकरी आस्मानी संकटात असतानाच लोकप्रतिनिधींनी मात्र मौन पाळले आहे. अतिवुष्टीने नुकसान झाले तरीही शासकीय मदत मिळण्यासाठी खासदार, आमदारांनी कोणतेही प्रयत्न केले नाहीत. शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी याकरीता कोणीही पुढे न आल्याने संकटातल्या शेतकऱ्यांचा वाली कोण, असा प्रश्‍न उपस्थित केला जात आहे.  शेतकऱ्यांना मदतीसाठी ना सत्ताधारी, ना विरोधक कोणीच बोलण्यास तयार नाही. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये भरपाईबाबत अस्वस्थता निर्माण झाली आहे. आर्णी तालुक्‍यात अतिवृष्टीने सोयाबीन कापसासह भाजीपाला पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. मोठ्या कष्टाने पिकविलेल्या पिकांचा आता काढणीचा हंगाम सुरू झाला होता. मागील पंधरा दिवसांपूर्वी सुद्धा पावसाने कहर केला होता. ऐन काढण्यासाठी आलेला शेतमाल भिजला. जणू हातातोंडाशी आलेला घास हिरावला, अशी परिस्थिती पाहायला मिळत आहे. गेल्या वर्षीसुद्धा परतीच्या पावसाने पिकांची नासाडी केली होती. या वर्षी ही निसर्ग कोपला. शासनाने अजूनही मदतीबाबत धोरण न आखल्याने दिवाळीसाठी लागणाऱ्या पैशाची सोय कशी करावी, या विवंचनेत शेतकरी आहेत. दुसरीकडे जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी देखील अशा नैसर्गीक संकटात शेतकऱ्यांची साथ सोडल्याचा आरोप होत आहे. शिवारातील नुकसानीची दखल घेण्यासाठी आमदार, खासदार यापैकी कोणीच फिरकले नाही. नेत्यांची ही असंवेदनशीलता देखील शेतकऱ्यांच्या जिव्हारी लागली आहे. पावसामुळे शिवारातील कापसाची बोंड सडली तर सोयाबीनला कोंब फुटले काही ठिकाणी शेतकऱ्यांनी पावसाच्या भीतीने सोयाबीनची काढणी आणि मळणी केली. परंतु अचानक आलेल्या पावसाने सोयाबीनचे ढीग भिजून नुकसान सोसावे लागले आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Ethanol Production : कांदा उत्पादकांच्या पाठोपाठ ऊस उत्पादकांनाही सरकारनं घोषणा करून भूलवलं ? | शेतीच्या बातम्या

Maharashtra Rain : राज्यात उष्णतेच्या लाटेचा इशारा; देशातील अनेक भागात तापमानाचा पारा ४२ ते ४६ अंशाच्या दरम्यान

Agriculture Success Story : नैसर्गिक उमाळ्यावर फुलली शेती, बहरले पर्यटन

Horticulture : ‘कोठली’ला मिळाला बागायती चेहरा

Guava Farming : जत तालुक्यात पेरूचे ‘कल्चर’

SCROLL FOR NEXT