कुपोषण, प्रथिने जागृतीकडे लक्ष वेधण्यासाठी सायकल रॅली
कुपोषण, प्रथिने जागृतीकडे लक्ष वेधण्यासाठी सायकल रॅली 
मुख्य बातम्या

कुपोषण, प्रथिने जागृतीकडे लक्ष वेधण्यासाठी सायकल रॅली

टीम अॅग्रोवन

पुणे : भारतात प्रथिनांच्या कमततेअभावी होणाऱ्या कुपोषणाचे प्रमाण मोठे आहे. याचा सामना करण्यासाठी पोल्ट्री उत्पादनांच्या वापरातून प्रथिने जागृतीवर भर देणे गरजेचे आहे. त्यासाठी पोल्ट्री फार्मर्स अॅंड ब्रिडर्स असोसिएशनच्या (पीएफबीए) प्रथिन जागृती मोहिमेअंतर्गत मंचर ते गोवा सायकल रॅलीचे आयोजन केले आहे. पोल्ट्री इंटिग्रेटर शेतकरी प्रमोद हिंगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली नुकतीच ही रॅली गोव्याकडे रवाना झाली आहे.

श्री. हिंगे म्हणाले, ‘‘रॅलीस उत्तम प्रतिसाद मिळत आहे. ‘चिकन खाओ हेल्थ बनाओ’ हे रॅलीचे घोषवाक्य आहे. भारतातील पोल्ट्री उत्पादने ही उच्च प्रतीची असून, या संदर्भात असलेल्या गैरसमजांचे व शंकांचेही निरसन केले जात आहे. तसेच कुपोषणाकडेही या निमित्ताने लक्ष वेधण्याचा प्रयत्न आहे.’’

पीएफबीएचे अध्यक्ष वसंतकुमार म्हणाले, की प्रत्यक्ष ब्रॉयलर उत्पादक आपल्या उत्पादनांचे ब्रॅंडिंग सायकल रॅलीच्या माध्यमातून ग्राहकापर्यंत पोचत आहे. हा अनुकरणीय उपक्रम असून, केवळ उत्पादन केंद्रित व्यवसाय न करता थेट व्रिक्री, प्राथमिक प्रक्रिया आणि ब्रॅंडिग यांसारख्या बाबींना पीएफबीएचे प्राधान्य आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar Export Ban : साखर निर्यातबंदीमुळे ऊस उत्पादकांच्या स्वप्नांची माती

Banana Rate : खानदेशात केळी दरात मोठी घसरण

Loksabha Election : कसबा पॅटर्नची संधी साधणार की हुकणार

Water Scarcity : पुणे विभागात पाण्यासाठी वणवण

Cotton Production : भारत कापूस उत्पादनात पडतोय पिछाडीवर

SCROLL FOR NEXT