Custard apple processing industry should be encouraged
Custard apple processing industry should be encouraged 
मुख्य बातम्या

सीताफळ प्रक्रिया उद्योगाला प्रोत्साहन द्यावे

टीम अॅग्रोवन

अकोला ः गेल्या काही वर्षात सीताफळ लागवडीकडे शेतकऱ्यांचा कल वाढला आहे. ही बाब एकीकडे उत्साहवर्धक मानता येणारी असतानाच दुसरीकडे सीताफळावर प्रक्रीया करणारे उद्योग तुलनेने नगण्य असल्याचा फटका उत्पादकांना बसत आहे. यंदा आॅक्टोबरच्या सुरुवातीला सातत्याने पावसाळी वातावरण होते. याच काळात सीताफळाची आवक वाढली आणि बाजारपेठेत दर कमी-अधिक होत राहिले. याचा मोठा फटका उत्पादकांना बसला आहे. हा प्रकार थांबविण्यासाठी सीताफळ प्रक्रीया उद्योगांसाठी प्रोत्साहन तसेच पायाभूत सुविधांची शासनाकडून निर्मिती केली जावी, अशी मागणी सीताफळ उत्पादकांमधून केली जात आहे.

राज्यात सीताफळाची लागवड ८० हजार हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावर पोचली आहे. कमी पाण्यावर येणाऱ्या या फळबागेला जंगली प्राण्यांचा कमी त्रास, इतर फळांच्या तुलनेत व्यवस्थापनावर कमी खर्च व शाश्‍वत उत्पादन या काही कारणांमुळे विदर्भातील शेतकरी ही सीताफळ लागवडीकडे वळाला आहे. त्यामुळे विदर्भात सीताफळाचे क्षेत्र २० हजार हेक्टरपर्यंत पोचले आहे.

दरवर्षी सीताफळ फळबागांची संख्या वाढत आहे. त्यामुळे बाजारपेठेत या फळाची आवकही सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये वाढते. यंदा सीताफळ काढणीला आले त्याच काळात पाऊस, सातत्याने ढगाळ वातावरण होते. अशावेळी फळबागांमधील फळे एकाचवेळी पिकायला सुरुवात झाली. एकीकडे फळ पिकत असताना बाजारात दुर्दैवाने तितका उत्साहवर्धक उठाव नव्हता. काही ठिकाणी कोरोनाच्या कारणाने ग्राहकांनी फळांना पसंती टाळली. यातून मार्ग काढत काही शेतकऱ्यांनी थेट ग्राहकांपर्यंत फळे पोचविण्याचा प्रयत्नही केला. परंतु बाजारपेठेत योग्य भाव मात्र मिळाला नसल्याचे उत्पादक सांगत आहेत. पावसामुळे यंदा फळधारणाही कमी झाली होती. त्यामुळेही नुकसान झेलावे लागले.

सीताफळ विक्रीसाठी अकोला व्हावे हब सीताफळाची अकोला ही एक मोठी बाजारपेठ म्हणून उदयास येत आहे. येथे विदर्भ, मराठवाडा, खानदेशातून विक्रीला येतात. हंगामात दर दिवसाला किमान दीड ते दोन हजार क्रेटपर्यंत आवक होत असल्याचे व्यापारी सूत्रांकडून सांगण्यात आले. शासनाने पायाभूत सुविधा निर्माण करण्याची गरज आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Accident Insurance Scheme : अपघात विमा योजनेतून ४५० शेतकरी कुटुंबांना मदत

Banana Sunburn : उन्हाच्या तीव्रतेमुळे जळताहेत केळीची रोपे

Summer Heat : मालेगावात वैशाखाआधीच वणवा

Adulterated Milk : भेसळयुक्त दूध रोखण्यासाठी उपाययोजना कराव्यात

Water Scarcity : कळंबा परिसरात पाण्याचा प्रश्‍न गंभीर

SCROLL FOR NEXT