मत्स्य पॅकेजमधील जाचक अटी शिथिल करण्यासाठी प्रयत्न सुरू
मत्स्य पॅकेजमधील जाचक अटी शिथिल करण्यासाठी प्रयत्न सुरू 
मुख्य बातम्या

मत्स्य पॅकेजमधील जाचक अटी शिथिल करण्यासाठी प्रयत्न सुरू

टीम अॅग्रोवन

सिंधुदुर्गनगरी ः मच्छीमारांच्या मागणीनंतर मत्स्य पॅकेजमधील जाचक अटी शिथिल करण्याच्या दृष्टीने हालचाली सुरू झाल्या आहेत. यासंदर्भात मुंबईत मत्स्य व्यवसायमंत्री अस्लम शेख आणि पालकमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत बैठक झाली. मच्छीमारांच्या मागणीचा प्रामुख्याने विचार करीत जाचक अटी शिथिल करण्याचा निर्णय यामध्ये घेण्यात आल्याचे मच्छीमारांकडून सांगण्यात येत आहे. राज्यातील महाविकास आघाडी सरकारने मच्छीमारांना ६५ कोटीचे मत्स्य पॅकेज जाहीर केले. परंतु हा लाभ देताना शासनाने घातलेल्या अटीमुळे तो लाभ मर्यादित मच्छीमारांना मिळणार होता. त्यामुळे मच्छीमारांमध्ये नाराजीचा सूर दिसून येत होता. त्यामुळे मच्छीमारांनी मालवण येथील मत्स्य विभागाच्या कार्यालयासमोर मोर्चा काढून आपल्या मागण्या नोंदविल्या होत्या. त्यामध्ये प्रामुख्याने एकाच कुटुंबातील एकाच व्यक्तीला लाभ देण्याची अट रद्द करावी, गिलनेट धारक, रापण संघ, आऊट बोट आणि इतर बोटीद्वारे मासेमारी करणाऱ्या सर्वांना लाभ द्यावा, मत्स्यविक्रेत्यांना लाभ द्यावा यांसह विविध मागण्या केल्या होत्या. या मागण्यांची दखल पालकमंत्री उदय सामंत, आमदार वैभव नाईक यांनी घेत हा प्रश्‍न मत्स्य व्यवसाय मंत्री अस्लम शेख यांच्यासमोर मांडला. त्यानंतर या विषयाबाबत चर्चा करण्यासाठी नुकतीच मंत्री शेख यांनी बैठक आयोजित केली होती. या बैठकीला पालकमंत्री सामंत, आमदार नाईक, शिवसेनेचे नेते संदेश पारकर आदी उपस्थित होते.

मंत्र्यांचे आश्‍वासन या बैठकीत मच्छीमारांना जाचक ठरणाऱ्या अटी शिथिल करण्याच्या दृष्टीने सकारात्मक चर्चा झाली. जाचक अटी शिथिल करण्यासंदर्भात लवकरच परिपत्रक काढले जाईल, असे शेख यांनी सिंधुदुर्गातील लोकप्रतिनिधींना सांगितले. जाचक अटी शिथिल करण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू झाल्यामुळे मच्छीमारांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cow Rearing : गोपालनात ऋतुनिहाय बदलांना प्राधान्य

Animal Care : जनावरांमधील धनुर्वातावर उपाययोजना

Ravindranath Tagor : चीनवर मोहिनी घालणारा साहित्यिक

Animal Care : वाढत्या तापमानात जनावरांचे व्यवस्थापन

Lok Sabha Elections : चुरशीने मतदान; सकाळी ९ पर्यंत कोल्हापूर ८.०४ टक्के तर हातकणंगले ७.५५ टक्के मतदानाची नोंद

SCROLL FOR NEXT