कापूस बियाणे
कापूस बियाणे 
मुख्य बातम्या

जळगावसाठी २३ लाख कापूस बियाणे पाकिटांची मागणी

टीम अॅग्रोवन
जळगाव ः जिल्ह्यात कापसाखालील क्षेत्र फक्त पाच टक्‍क्‍यांनी घटेल, असे गृहीत धरून यंदा कापूस बियाण्याची मागणी कृषी आयुक्तालयाकडे करण्यात आली आहे. यंदा २३ लाख २० हजार कापूस बियाण्याची पाकिटे मिळतील, असे जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाने म्हटले आहे. 
 
यंदा जिल्ह्यात गुलाबी बोंड अळीच्या प्रादुर्भावामुळे कापसाचे अतोनात नुकसान झाले. ९० टक्के क्षेत्रात मोठे नुकसान झाल्याचा अंदाज होता. राज्यात सर्वाधिक कापूस लागवड जळगाव जिल्ह्यात होते. मागील हंगामात चार लाख ७५ हजार हेक्‍टरवर लागवड झाली होती. यंदा या क्षेत्रात सुमारे पाच टक्के घट होईल, असा अंदाज कृषी विभागाने बांधला आहे. कारण, कापसाला दुसरे पर्यायी पीक नाही. त्यामुळे कापूस लागवड होईलच, असे कृषी विभागाने म्हटले आहे. 

जिल्ह्यात ९८ टक्के कापसाखालील क्षेत्र बीटी कापूस वाणांखाली व्यापते. फक्त दोनच टक्के क्षेत्रावर देशी सुधारीत कापूस वाणांची लागवड केली जाते. जिल्ह्यात सुमारे १८ लाख पाकिटांची विक्री होते. त्यात अधिक मागणी असलेल्या काही कापूस वाणांचा अधिकचा पुरवठा होत असतो.

यंदा मात्र सर्वच बीटी कापूस वाण गुलाबी बोंड अळीला बळी पडल्याने शेतकरी अजूनही संभ्रमात आहेत. मागील वर्षी बीटी कापूस बियाण्याचे पाकीट ८०० रुपये दरात मिळाले होते. यंदा त्याच्या दरात आणखी घट केली असून दर ७४० रुपये प्रतिपाकीट असणार आहे. अद्याप त्यासंबंधी स्पष्ट सूचना आलेल्या नसल्याचे जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाने स्पष्ट केले आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Tata Tea : ‘टाटा टी’कडून शेतकऱ्यांनी काय शिकायला हवे?

Indian Politics : पतंग, रेवड्या आणि वास्तव

Cotton Market : कापूस का काळवंडला?

Agriculture Commodity : मक्याच्या दरात घसरण; हळदीची पुन्हा उसळी

Kolhapur Market Rate : कोंथिबीर, पालेभाज्या २० रुपये पेंढी उष्म्यामुळे भाजी मंडईत आवक घटली

SCROLL FOR NEXT