खेडाखरेदीसाठी व्यापारी अशी कापसाची प्रतीक्षा करत असतात
खेडाखरेदीसाठी व्यापारी अशी कापसाची प्रतीक्षा करत असतात 
मुख्य बातम्या

खेडाखरेदीत कापूस कवडीमोल

Gopal Hage

अकोला ः सप्टेंबरमध्ये शेवटच्या टप्प्यात आलेल्या संततधार पावसाने काढणीला आलेल्या कापसाचे प्रचंड नुकसान झाले. सध्या ज्या कापसाची वेचणी सुरू झाली तो अगदी कवडीमोल म्हणजेच ३५०० ते ३८०० रुपये क्विंटल दराने खरेदी केला जात आहे. शासनाने तातडीने कापसाची खरेदी केंद्रे सुरू करावीत, अशी मागणी कापूस उत्पादकांनी केली आहे.   केंद्राने मध्यम धाग्याच्या कापसाला ४०२०; तर लांब धाग्याला ४३२० रुपये दर २०१७-१८ या हंगामासाठी जाहीर केलेला आहे. या हंगामात कापसाचा दर्जा सुरवातीलाच खालावलेला आहे. सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्यानंतर बराच काळ पाऊस पडल्याने वेचणीला आलेला कापूस ओला झाला होता. त्यामुळे कापूस ओलसर असल्याच्या कारणाने व्यापाऱ्यांनी अवघा अडीच हजारांच्या आत त्याची खरेदी केली. आता दर्जा सुधारला तरी ३८०० पर्यंत खरेदी केली जात आहे. प्री-मॉन्सून लागवड असलेल्या क्षेत्रातून कापूस काढणीला दसऱ्यापासून वेग घेतला आहे. या मोसमात कपाशीवर गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव वाढला होता. त्यामुळे बोंड्या खराब झाल्या. एवढे होऊनही प्रादुर्भावापासून वाचलेल्या बोंड्या फुटायला सुरवात झाली त्या वेळी काही दिवस संततधार पाऊस पडला होता. यामुळे बोंड्या काळवंडल्या. यातून निघालेला कापूस एकरतर कवडीयुक्त निघाला. शिवाय पिवळसरही झाला. हा कापूस शेतकरी विक्री करीत आहेत. आता चांगल्या दर्जाचा कापूस निघायला आला तरी तोही याच दराने मागितला जात असल्याने शेतकऱ्यांची अडचण झाली आहे. बुलडाणा जिल्ह्यात मलकापूर, नांदुरा, जळगाव जामोद, संग्रामपूर, अकोला जिल्ह्यात तेल्हारा, अकोट या भागात प्री.-मॉन्सून कपाशीची लागवड झालेली आहे. मे महिन्यात अखेरीस तसेच जूनच्या पहिल्या आठवड्यात पेरणी झालेल्या या कापसाची काढणी सुरू झाली.  सध्या शेतकरी हा कापूस विकून मोकळा होत आहेत. आगामी काळात दिवाळीसारखा मोठा सण असून रब्बीचीही चाहूल लागली आहे. या दोन्हीसाठी लागणारा पैसा कापूस विकून शेतकरी उभा करीत आहेत. शेतकऱ्यांची गरज पाहता व्यापारी कमी दराने मागणी करीत असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. शासनाची खरेदी सुरू झाल्यास बाजारपेठेत आपोआप तेजी येते हा नेहमीचा अनुभव असल्याने शासनाच्या खरेदीची मागणी सर्वत्र जोर पकडत आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

The Economist : इकॉनॉमिस्टच्या नजरेतून दक्षिण व उत्तर भारत

Urja Bio System : शाश्‍वत ऊर्जेसाठी ‘ऊर्जा बायो सिस्टिम प्रा. लि.’ची साथ

Crop Insurance : पीकविम्याचे बदल शेतकऱ्यांच्या किती फायद्याचे?

Weekly Weather : कमाल, किमान तापमानात वाढ; उष्णतेच्या लाटेची शक्यता

Mahabeej Seed : महाबीजने बियाण्यात साधली विक्रमी वाढ

SCROLL FOR NEXT