धान उत्पादकांचे  १११ कोटींचे बोनस अडले Of cotton growers 111 crore bonus stagnant
धान उत्पादकांचे  १११ कोटींचे बोनस अडले Of cotton growers 111 crore bonus stagnant 
मुख्य बातम्या

भंडारा : धान उत्पादकांचे १११ कोटींचे बोनस अडले 

टीम अॅग्रोवन

भंडारा : जिल्ह्यात आतापर्यंत २७ लाख ३१ हजार ५१७ क्‍विंटल धानाची आधारभूत किमतीने खरेदी करण्यात आली आहे. त्यानुसार ३१० कोटी ८७ लाख ७१ हजार रुपयांचे चुकारे करण्यात आले. मात्र बोनसच्या १९१ कोटी ७६ लाख ६१ हजार रुपयांच्या रक्‍कमेची शेतकऱ्यांना प्रतीक्षा लागून आहे. 

धानाचे कोठार अशी भंडारा जिल्ह्याची ओळख. जिल्ह्यात उत्पादित धानाची शासकीय आधारभूत केंद्रावर खरेदी होते. १ नोव्हेंबर २०२० पासून १४८ केंद्रावर धान खरेदीची सुरुवात झाली. आतापर्यंत जिल्ह्यातील १२ हजार ९० शेतकऱ्यांनी २७ लाख ३९ हजार ४१७ क्‍विंटल धानाची विक्री आधारभूत दराने केली आहे. या धानाची किंमत ५११ कोटी ७४ लाख १९ हजार ३९९ रुपये आहे. शेतकऱ्यांच्या खात्यात ३१० कोटी ८७ लाख ७१ हजार २१६ रुपये जमा करण्यात आले. तर आधारभूत किमतीनुसार २०० कोटी ८६ लाख ४८ हजार १८३ रुपयांचे चुकारे अद्यापही थकीत आहेत.

राज्य शासनाने धान उत्पादक शेतकऱ्यांना ७०० रुपये बोनस जाहीर केला. आधारभूत किंमत १८६८ रुपये आणि त्यावर ७०० रुपये बोनस याप्रमाणे २५६८ रुपये धानाला दर मिळत आहे. मात्र आतापर्यंत केवळ आधारभूत दरानेच चुकारे करण्यात आले. त्यामुळे शेतकऱ्यांना बोनसच्या रक्‍कमेची प्रतिक्षा आहे. ९२ हजार ९० शेतकऱ्यांच्या बोनसचे १९१ कोटी ७६ लाख ६१ हजार रुपये होतात. आता ही रक्‍कम शेतकऱ्यांना केव्हा मिळणार याची प्रतीक्षा लागली आहे. 

दरम्यान, बोनसबाबत शेतकऱ्यांकडून विचारणा होत असल्याची दखल घेत महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटीव्ह मार्केटिंग फेडरेशनचे सरव्यवस्थापक डॉ. अतुल नेरकर यांनी सर्व जिल्हा मार्केटिंग अधिकाऱ्यांना पत्र लिहिले आहे. त्यानुसार एक एप्रिलनंतर निधी उपलब्धतेनुसार दोन ते तीन टप्प्यात बोनसची रक्‍कम दिली जाईल, असे त्यात नमूद आहे.  अशी आहे खरेदी (क्विंटल) 

तालुका शेतकरी एकूण खरेदी 
भंडारा ८०६२ २४७४२९ 
मोहाडी १३९१८ ३९५१३४
तुमसर १६७७७ ५३०९५८
लाखनी १३१६९ ३५०१४१ 
साकोली १२८२५ ३५५४५१ 
लाखांदूर १९१८० ५७६४७५ 
पवनी ८८७९ -२८३९२८ 
एकूण ९२०९० २७३९५१७

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Rain : सोमवारपासून पुन्हा पावसाचा अंदाज; राज्यातील बहुतांशी भागात ऊन आणि उकाडा वाढण्याची शक्यता

Kharif Planning Review Meeting : आठ लाख हेक्टरवर खरीप पेरण्यांचे नियोजन

Banana Farming Management : सिंचन, खत व्यवस्थापनावर भर

Kokan Development : कोकणातील आंबा पिकासाठी स्वतंत्र मंडळ स्थापणार

Indian Agriculture : शेतातील सेंद्रिय पदार्थाचे पुनर्चक्रीकरण

SCROLL FOR NEXT