अकोटमध्ये कापसाला ४८७० ते ५१५० रुपये भाव
अकोटमध्ये कापसाला ४८७० ते ५१५० रुपये भाव 
मुख्य बातम्या

अकोटमध्ये कापसाला ४८७० ते ५१५० रुपये भाव

टीम अॅग्रोवन

अकोला : या हंगामात कापसाला चांगला भाव मिळवून देणाऱ्या अकोट कृषी उत्पन्न बाजार समितीत बुधवारी (ता. १४) ४८७० ते ५१५० दरम्यान भाव मिळाला. या हंगामात येथील बाजारात साडेपाच हजारांपेक्षा अधिक दर या बाजारात मिळाला होता. बुधवारी अकोट बाजारात सुमारे १९२९ क्विंटल कापसाची अावक झाली होती. या बाजारात तुरीच्या अावकेत वाढ झालेली अाहे. या हंगामात लावलेली तूर विक्रीसाठी येत अाहे. बुधवारी ८२७ क्विंटल अावक होती. तुरीला कमीत कमी ३८५५ व जास्तीत जास्त ४३२० रुपये भाव भेटला.  हरभऱ्याची ९७५ क्विंटल अावक झाली होती. ३४४० ते ३८०० दरम्यान हरभरा विकल्या गेला. बुधवारी या ठिकाणी अोव्या (अजवान)ची २२ क्विंटल अावक झालेली होती. या हंगामातील अोव्याला ४०५५ ते ६६०० रुपये दर मिळाला. सोयाबीनलासुद्धा ३१४० ते ३५७५ असा चांगला दर मिळाला. गेले तीन-चार दिवस या भागात ढगाळ वातावरण बनलेले होते. बुधवारी वातावरणात चांगले होताच बाजारात अावक वधारली. तरीही सोयाबीन, मूग, उडीद, ज्वारी, गहू या धान्याची अावक तितकीशी नव्हती. कापसाची अावक चांगली राहल्याचे बाजार समिती प्रशासनाकडून सांगण्यात अाले. येत्या काळात या धान्याची अावक पूर्वपदावर येण्याची शक्यता वर्तविल्या गेली.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Accident Insurance Scheme : अपघात विमा योजनेतून ४५० शेतकरी कुटुंबांना मदत

Banana Sunburn : उन्हाच्या तीव्रतेमुळे जळताहेत केळीची रोपे

Summer Heat : मालेगावात वैशाखाआधीच वणवा

Adulterated Milk : भेसळयुक्त दूध रोखण्यासाठी उपाययोजना कराव्यात

Water Scarcity : कळंबा परिसरात पाण्याचा प्रश्‍न गंभीर

SCROLL FOR NEXT