Cotton buying started at Kuntur, Naigaon center
Cotton buying started at Kuntur, Naigaon center  
मुख्य बातम्या

नायगाव, कुंटूर केंद्रावर कापूस खरेदी सुरु

टीम अॅग्रोवन

नांदेड : भारतीय कापूस महामंडळातर्फे नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यातील १८ शासकीय खरेदी केंद्रांपैकी केवळ नांदेड जिल्ह्यातील नायगाव आणि कुटूंर या दोन केंद्रांवर कापूस खरेदी सुरु झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. परंतु, अद्याप या तीन जिल्ह्यांतील राज्य सहकारी कापूस उत्पादक महासंघाच्या सर्व ६ आणि भारतीय कापूस महामंडळाच्या १० केंद्रांतंर्गच्या शेतकऱ्यांना खरेदी सुरु होण्याची प्रतीक्षा आहे. 

‘लॉकडाउन’मध्ये ‘सोशल डिस्टन्सिंग’ राखून सोमवार (ता.२०) पासून शासकीय कापूस खरेदी सुरु करण्याचे आदेश सहकार आणि पणन विभागातर्फे देण्यात आले आहेत. परंतु, जिनिंग प्रेसिंग उद्योजक या परिस्थितीत रुईची टक्केवारी आणि घट आदी कारणांवरुन खरेदी करण्यास तयार नाहीत.

अनेक जिनिंग फॅक्टरीमध्ये मजुरांची समस्या आहे. ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर गर्दी कमी करण्यासाठी ऑनलाइन शेतकरी नोंदणी सुरु आहे. नांदेड आणि परभणी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. बाजार समित्यांमार्फत नोंदणी केलेल्या शेतकरी याद्यांचे प्रमाणिकरण केले जात आहे. 

संबंधित यंत्रणा खरेदीच्या पूर्वतयारीतचआहेत. बुधवार (ता.२२) पर्यंत नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यातील महासंघाच्या केंद्रावर खरेदी सुरु झाली नव्हती. भोकर (जि.नांदेड) येथील केंद्रावर गुरुवार (ता.२३) पासून खरेदी सुरु होईल. परभणी जिल्ह्यात पणन महासंघाचे अधिकारी आणि जिनिंग उद्योजक यांच्यात खरेदीच्या नियोजनाबाबत चर्चा झाली. 

नांदेड जिल्ह्यातील नायगाव येथे सोमवार (ता.१३) पासून खरेदी सुरु झाली. मंगळवार (ता.२१) पर्यंत ११२ शेतकऱ्यांचा २ हजार २४१ क्विंटल कापूस खरेदी करण्यात आला. कुंटूर (ता.नायगाव) येथील केंद्रावर शुक्रवार(ता.१७) पासून कापूस खरेदी सुरु झाली आहे. मंगळवारपर्यंत १०० शेतकऱ्यांच्या १ हजार ५०९ क्विंटल कापसाची खरेदी करण्यात आली, असे सूत्रांनी सांगितले. या तीन जिल्ह्यातील १६ केंद्रांवर तत्काळ कापूस खरेदी सुरु करुन शेतकऱ्यांना दिलासा देण्याची गरज आहे.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cow Rearing : गोपालनात ऋतुनिहाय बदलांना प्राधान्य

Animal Care : जनावरांमधील धनुर्वातावर उपाययोजना

Ravindranath Tagor : चीनवर मोहिनी घालणारा साहित्यिक

Animal Care : वाढत्या तापमानात जनावरांचे व्यवस्थापन

Lok Sabha Elections : चुरशीने मतदान; सकाळी ९ पर्यंत कोल्हापूर ८.०४ टक्के तर हातकणंगले ७.५५ टक्के मतदानाची नोंद

SCROLL FOR NEXT