लसीकरणाची उद्या देशभरात रंगीत तालीम 
लसीकरणाची उद्या देशभरात रंगीत तालीम  
मुख्य बातम्या

लसीकरणाची उद्या देशभरात रंगीत तालीम 

सकाळ न्यूज नेटवर्क

नवी दिल्ली ः कोरोना लसीकरण मोहीम लवकरच सुरू होणार असल्याच्या पंतप्रधान मोदींच्या घोषणेनंतर केंद्र सरकारने या मोहिमेच्या अंमलबजावणीची देशभरात रंगीत तालीम घेण्याची तयारी केली आहे. दोन जानेवारीला ही रंगीत तालीम होईल, असे आरोग्य मंत्रालयाकडून कळते.  या आधी पंजाब, आसाम, गुजरात आणि आंध्रप्रदेशात रंगीत तालीम झाली होती. या चारही राज्यांमध्ये सकारात्मक परिणाम दिसून आल्यानंतर देशभरात रंगीत तालीम घेण्याचा निर्णय सरकारने केला आहे. कोरोना लस वापरासाठी मंजुरी मिळताच देशभरात लसीकरण सुलभतेने करता यावे यासाठी ही रंगीत तालीम असून यामध्ये सर्व राज्यांच्या राजधानीच्या शहरात तीन केंद्रांवर ही मोहीम राबविली जाईल. अर्थात, शहरी भागाप्रमाणेच राज्यामधील दुर्गम भागातील आणि आरोग्य सुविधा समाधानकारक नसलेल्या जिल्ह्यांमध्येदेखील लसीकरणाची पूर्वतयारी केली जाईल.  केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी आज व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे लसीकरणाच्या प्रस्तावित रंगीत तालमीसाठी राज्यांसमवेत बैठक घेतली. यात राज्यांचे आणि केंद्रशासित प्रदेशांचे आरोग्य सचिवांसोबतच राष्ट्रीय आरोग्य मिशनचे संचालक आणि अन्य अधिकारी देखील सहभागी झाले होते. लसीकरणाच्या आपत्कालीन उपयोगासाठी परवानगी देण्याच्या सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया, फायजर आणि भारत बायोटेक प्रायव्हेट लिमिटेड या लस उत्पादक कंपन्यांच्या मागणीवर आज विचारविमनिय झाला. या बैठकीनंतर आरोग्य मंत्रालयाने लसीकरणासाठी दोन जानेवारीला रंगीत तालीम घेण्याचा निर्णय केला. दरम्यान, पूर्वतयारीबाबत उद्या (ता. १) आणखी एक बैठक होणार असल्याचेही कळते. 

अशी होणार रंगीत तालीम  आरोग्य मंत्रालयाच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार लस वितरणासाठी प्रत्येक राज्यामध्ये किमान तीन केंद्रे निश्चित केली जातील, याठिकाणी लाभार्थींना नोंदणी करता येईल. तत्पूर्वी सर्वसाधारण लसीकरण मोहिमेप्रमाणेच ही रंगीत तालीम घेतली जाणार असून केंद्राच्या दिशानिर्देशांनुसार राज्यांना दोन शहरे निवडावी लागतील. या शहरांमध्ये कोरोना प्रतिबंधक लस पोहोचविणे, ही लस रुग्णालयांपर्यंत नेऊन रुग्णांना डोस देण्याची प्रक्रिया पूर्ण केली जाईल. यामध्ये शीतपेट्यांमध्ये लसीची साठवणूक, लसीकरणासाठी येणाऱ्या लाभार्थींची नोंदणी, लस दिल्यानंतरचा वैद्यकीय सल्ला या प्रक्रियांचाही समावेश असेल. यावेळी, लसीकरणासाठी केंद्र सरकारने बनविलेल्या ‘कोविन’ या मोबाईल अॅपचीही चाचणी घेतली जाईल. याद्वारे नोंदणीकृत लाभार्थींना लसीकरणासाठी ‘एसएमएस’ पाठवून सूचना दिली जाईल. त्यानंतर लस दिली जाईल. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Accident Insurance Scheme : अपघात विमा योजनेतून ४५० शेतकरी कुटुंबांना मदत

Banana Sunburn : उन्हाच्या तीव्रतेमुळे जळताहेत केळीची रोपे

Summer Heat : मालेगावात वैशाखाआधीच वणवा

Adulterated Milk : भेसळयुक्त दूध रोखण्यासाठी उपाययोजना कराव्यात

Water Scarcity : कळंबा परिसरात पाण्याचा प्रश्‍न गंभीर

SCROLL FOR NEXT