Corona 'grape growing farmers in crisis
Corona 'grape growing farmers in crisis  
मुख्य बातम्या

लातूर जिल्ह्यातील द्राक्ष उत्पादक शेतकरी संकटात  

टीम अॅग्रोवन

चापोली, जि. लातूर : ‘कोरोना’चा फैलाव रोखण्यासाठी शासनाकडून सध्या संचार बंदी केली आहे. त्याचा परिणाम द्राक्ष बागायतदार शेतकऱ्यांवर झाला असून सध्या व्यापाऱ्यांनी द्राक्ष खरेदीकडे पाठ फिरवल्यामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान होत आहे. शासनाने द्राक्ष उत्पादकांना मदत जाहीर करून दिलासा द्यावा, अशी मागणी शेतकरी करीत आहे. 

आनंवाडी (ता. चाकूर) येथील विष्णुदास पासमे यांनी जून २००६ मध्ये दोन एकरवर द्राक्ष बाग उभी केली. गेल्या १३ वर्षांपासून ते सातत्याने द्राक्षांचे उत्पादन घेत आहेत. सध्या द्राक्षांचा तोडणीचा हंगाम सुरू झाला आहे. मात्र, ‘कोरोना’ने त्यांच्या मेहनतीवर पाणी फिरवल्याचे दिसून येत आहे. परिणामी बागायतदार शेतकऱ्यांवर आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागत आहे. व्यापाऱ्यांनी द्राक्ष खरेदीकडे पाठ फिरवल्याने पासमे यांना द्राक्षांचे काय करावे, हा प्रश्न त्यांच्या समोर उभा आहे. 

आत्तापर्यंत द्राक्ष बागेवर छाटणी, फवारणी व मजूर यासह साधारण चार लाख रुपयांचा खर्च झाला आहे. त्यांना दोन एकरावरील बागेतून यंदा २५ ते ३० टन द्राक्षांचे उत्पादन अपेक्षित आहे. अजून आठ दिवस झाडावरील द्राक्ष सुस्थितीत राहतील. मात्र, नंतर ते खराब होतील. पासमे यांच्याकडून दरवर्षी छत्तीसगड, हैद्राबाद, अकोला, बुलढाणा, वाशीम व अंबाजोगाई येथील व्यापारी जाग्यावरून द्राक्षांची खरेदी करतात. मात्र, ‘कोरोना’ विषाणूच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठ बंद आहेत. 

वाहतुकीची साधने नाहीत. त्यामुळे अपेक्षेप्रमाणे विक्री होत नसल्याने व्यापारी यायला तयार नाहीत. त्यात अधूनमधून ढगाळ वातावरण व अल्पप्रमाणात पाऊस ही पडत आहे. अशातच जर गारपीट अथवा वादळी वाऱ्यासह पाऊस पडला तर द्राक्ष मातीमोल होतील, या भीतीने पासमे यांची झोपच उडाली आहे. 

दिवसरात्र एक करून मोठ्या मेहनतीने द्राक्ष बागेचे संगोपन केले. परिणामी चांगले उत्पादन पदरात पडले. मात्र, ‘कोरोना’मुळे डोळ्यासमोर द्राक्षांची होत असलेली नासाडी पहावत नाही. व्यापाऱ्याला दररोज फोन करत आहे पण कोणीही यायला तयार नाही. यावर्षी खर्चही निघणार नाही, अशी स्थिती आहे. आता शासनानेच आम्हाला या संकटातून बाहेर काढण्यासाठी आधार द्यावा.  - विष्णुदास पासमे,  द्राक्ष उत्पादक आनंदवाडी.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Rain : सोमवारपासून पुन्हा पावसाचा अंदाज; राज्यातील बहुतांशी भागात ऊन आणि उकाडा वाढण्याची शक्यता

Kharif Planning Review Meeting : आठ लाख हेक्टरवर खरीप पेरण्यांचे नियोजन

Banana Farming Management : सिंचन, खत व्यवस्थापनावर भर

Kokan Development : कोकणातील आंबा पिकासाठी स्वतंत्र मंडळ स्थापणार

Indian Agriculture : शेतातील सेंद्रिय पदार्थाचे पुनर्चक्रीकरण

SCROLL FOR NEXT