सेवा केंद्र नसलेल्या ठिकाणी ‘मोबाईल’ व्हॅन देणार गावातच सुविधा 
मुख्य बातम्या

सेवा केंद्र नसलेल्या ठिकाणी ‘मोबाईल’ व्हॅन देणार गावातच सुविधा

टीम अॅग्रोवन

बुलडाणा  : एमएच सीएससी व्हीएलई मल्टीपर्पज को-ऑप सोसायटी व जिल्हाधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त माध्यमातून आपले सरकार सेवा केंद्र मोबाईल व्हॅनचे जिल्हाधिकारी सुमन चंद्रा यांच्या हस्ते उद्‍घाटन झाले.  या वेळी निवासी उपजिल्हाधिकारी आर. एस. पुरी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी नरेंद्र नाईक, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रेमचंद पंडित, उपविभागीय कृषी अधिकारी संतोष डाबरे, जिल्हा सूचना व विज्ञान अधिकारी श्री. चव्हाण, सीएससी जिल्हा व्यवस्थापक जयेश कठोरे, योगेश जाधव, विजयसिंह सूर्यवंशी आदी उपस्थित होते.  महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या लाभासाठी आधार प्रमाणीकरण आवश्‍यक आहे. आधार प्रमाणीकरण करण्यासाठी जेथे आपले सरकार सेवा केंद्र नाही, अशा ठिकाणी हे मोबाईल आपले सरकार सेवा केंद्र शेतकऱ्यांच्या कर्जखात्याशी आधार प्रमाणीकरण करून देईल. तसेच ज्या ठिकाणी आपले सरकार सेवा केंद्र आहे. मात्र, दुसऱ्या केंद्राची आवश्‍यकता आहे. अशा ठिकाणी सदर मोबाईल व्हॅन सेवा देईल. या केंद्रात महाऑनलाईन व सीएससी सर्व सेवा उपलब्ध असणार आहे. ही व्हॅन सीएससी सोसायटीच्या वतीने कार्यान्वित करण्यात येणार आहे. शाळांचे निकाल लागल्यानंतर ही व्हॅन शाळा- महाविद्यालयांमध्ये जाऊन मुलांचे उत्पन्नाचे दाखले, जात प्रमाणपत्र काढून देण्याची सेवा देईल. या माध्यमातून शाळामहाविद्यालयांमधून मोबाईल सेतू'' उपक्रम राबविता येणार आहे. सेवा हमी कायद्यानुसार मिळणाऱ्या सुविधा सुलभतेने मिळाव्यात यासाठी या मोबाईल व्हॅनचा उपयोग करून घेण्यात येणार आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी श्री. पुरी यांनी दिली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver Third List: कर्जमाफीची तिसरी यादी जाहीर, ३ लाख ५१ हजार १९२ शेतकऱ्यांचा समावेश

Sugar MSP: साखर 'एमएसपी' प्रश्नी दिल्लीतील बैठक निष्फळ, उद्यापासून महाराष्ट्र-कर्नाटकातील महामार्ग रोखणार, राजू शेट्टींचा इशारा

Canal Repair : पहिल्या आवर्तनापूर्वी कालव्यांची दुरुस्ती करा

Solar Irrigation : सातारा जिल्ह्यातील उपसा सिंचन योजना सौर ऊर्जेुळे उजळणार

Water Tanker Surge : टॅंकरच्या संख्येत झपाट्याने वाढ

SCROLL FOR NEXT