Consumption of legumes, herbs Healthy: More 
मुख्य बातम्या

रानभाज्या, तणभाज्यांचे सेवन आरोग्यवर्धक : मोरे

नाशिक : ‘‘रानात, वनात, शेतीत विनापेरणी, विनामाशागत, रासायनिक खतांशिवाय विविध रानभाज्या, तण भाज्या येत असतात. त्या त्या हंगामात येणाऱ्या या भाज्यांचा समावेश आहारात केल्यास उपयुक्त ठरेल’’, असे आवाहन गुरुमाउली मोरे यांनी केले.

टीम अॅग्रोवन

नाशिक : ‘‘रानात, वनात, शेतीत विनापेरणी, विनामाशागत, रासायनिक खतांशिवाय विविध रानभाज्या, तण भाज्या येत असतात. त्या त्या हंगामात येणाऱ्या या भाज्यांचा समावेश आहारात केल्यास उपयुक्त ठरेल. त्यामुळे औषधांची आणि दवाखान्याची गरजच पडणार नाही. म्हणून या नैसर्गिक ठेव्याची माहिती करून घेऊन त्याचा लाभ घ्यावा’’, असे आवाहन गुरुमाउली मोरे यांनी केले. 

श्री स्वामी समर्थ गुरुपीठ दिंडोरीप्रणीत यांच्या कृषीशास्त्र विभागांतर्गत आबासाहेब मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली त्र्यंबकेश्‍वर येथील श्री स्वामी समर्थ गुरुपीठ येथे रानभाजी, तणभाजी व देशी बीबियाणे महोत्सव झाला. सामाजिक वनीकरण विभागाच्या सहायक वन संरक्षक वनिता बरगे, नाबार्डचे सहायक महाव्यवस्थापक प्रमोद पाटील, सचिन कांबळे उपस्थित होते.

‘‘आपल्या आहारात पोषण वाढविण्यासाठी रानभाज्या उपयुक्त ठरतात. त्यामुळे शरीरातील प्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी या भाज्यांची मदत होते. हा निसर्गाने दिलेला ठेवा आहे.’’

सध्या उपलब्ध हंगामी रानभाज्या, तण भाज्या प्रदर्शनात मांडण्यात आल्या. तज्ज्ञांनी रानभाजी, तणभाजी यांची ओळख, संवर्धन, त्यांचे औषधी गुणधर्म, भाजी तयार करण्याची पद्धत याबाबत मार्गदर्शन केले.    

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage Inspection: जिल्हाधिकारी शेताच्या बांधावर; पीक पाहणी करून साधला संवाद

Sustainable Aviation Fuel Project: शाश्वत विमान इंधन निर्मिती प्रकल्प ‘नॅचरल’ उभारणार; बी. बी. ठोंबरे यांची माहिती

Crop Insurance Compensation: हवामान मापक यंत्रावरील नोंदणी ग्राह्य धरून पीकविमा परतावा द्या : महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

Railway Protest: रेल्वेचा निर्णय होईपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार; संगमनेरकरांचा इशारा

Weekly Weather: महाराष्ट्रातून मॉन्सून बाहेर पडण्याच्या मार्गावर

SCROLL FOR NEXT