ग्राहक हितास्तव ३५ रू प्रतिकिलोने तूरडाळ विक्रीचा निर्णय स्वागतार्ह
ग्राहक हितास्तव ३५ रू प्रतिकिलोने तूरडाळ विक्रीचा निर्णय स्वागतार्ह  
मुख्य बातम्या

ग्राहक हितास्तव ३५ रू प्रतिकिलोने तूरडाळ विक्रीचा निर्णय स्वागतार्ह

वृत्तसेवा

मुंबई : राज्यातील स्वस्त धान्य दुकानातुन सध्या विक्री करण्यात येत असलेल्या  तूरडाळीचा दर ५५ रू प्रती किलो ऐवजी ग्राहकांच्या हितास्तव ३५ रू प्रती किलो निश्चित करण्याचा  मंत्रीमंडळाचा  निर्णय स्वागतार्ह असल्याची प्रतिक्रिया पणनमंत्री सुभाष देशमुख यांनी दिली.

या निर्णयाबद्दल त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह मंत्रीमंडळ सदस्यांचे आभार मानले. श्री. देशमुख म्हणाले, या निर्णयाने या  हंगामात खरेदी केलेली व पुढील कालावधीत खरेदी करावयाच्या तूर साठवणुकीसाठी गोदामे  रिकामी होण्यास मदत होईल. थेट ग्राहकांना लाभ होण्यासाठी बाजार हस्तक्षेप योजनेंतर्गत 55 रू प्रती किलो ऐवजी  35 रु प्रती किलो दराने तूर डाळ विक्रीचा निर्णय महत्वाचा आहे.

शासनाचे सार्वजनिक उपक्रम, स्थानिक स्वराज्य संस्थाना पुर्णत: अथवा अंशत: अनुदानित संस्थाद्वारे तूरडाळीची खरेदी पुढील आदेश होईपर्यत फक्त राज्य पणन महासंघाकडूनच शासकीय दराने करणे बंधनकारक करण्यात आले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Tata Tea Brand : ‘टाटा टी’कडून शेतकऱ्यांनी काय शिकायला हवे?

Indian Politics : पतंग, रेवड्या आणि वास्तव

Cotton Market : कापूस का काळवंडला?

Agriculture Commodity : मक्याच्या दरात घसरण; हळदीची पुन्हा उसळी

Kolhapur Market Rate : कोंथिबीर, पालेभाज्या २० रुपये पेंढी उष्म्यामुळे भाजी मंडईत आवक घटली

SCROLL FOR NEXT