`जलयुक्त`ची कामे पूर्ण करावीत : पी. शिवाशंकर  
मुख्य बातम्या

`जलयुक्त`ची कामे पूर्ण करावीत : पी. शिवाशंकर

टीम अॅग्रोवन

परभणी : टंचाईवर मात करण्यासाठी जलयुक्त शिवार अभियानांतर्गतची अपू्र्ण कामे प्राधान्याने पूर्ण करावीत. मंजूर कामे पूर्ण केल्याशिवाय संबंधित गावांमध्ये इतर कोणत्याही प्रकारच्या योजना मंजूर करू नयेत, असे निर्देश जिल्हाधिकारी पी. शिवाशंकर यांनी दिले.

जिंतूर तालुक्यातील टंचाई आढावा बैठकीमध्ये शिवाशंकर बोलत होते. या वेळी जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी पृथ्वीराज बी. पी., उपविभागीय अधिकारी उमाकांत पारधे, तहसीलदर सुरेश शेजुळ, संबंधित विभागाचे अधिकारी, सरपंच उपस्थित होते.

शिवाशंकर म्हणाले, ‘‘पाणीटंचाईवरील उपाययोजनांतर्गत अधिग्रहित करण्यात आलेल्या विहिरी, कूपनलिकांतून ग्रामस्थांना नियमित पाणीपुरवठा होत असल्याची खात्री करावी. तलाठी, ग्रामसेवकांनी टंचाईग्रस्त गावांना नियमित भेटी देऊन ग्रामस्थांच्या अडीअडचणी जाणून घ्याव्यात, त्या सोडविण्यासाठी प्रयत्न करावेत. टॅंकर सुरू असलेल्या गावात टॅंकर दररोज जात असल्याची तपासणी करावी.‘‘ 

पृथ्वीराज म्हणाले, ‘‘वाटर कप स्पर्धेत लोकसहभाग वाढविण्याची गरज आहे. जिल्हाधिकारी आणि मुख्यकार्यकारी अधिकारी स्वतः दोन गावामध्ये श्रमदान करणार आहेत.‘‘ 

शिवाशंकर आणि पृथ्वीराज यांनी घेवंडा येथील अधिग्रहण करण्यात आलेली विहिर, मांडवा येथे पाणीपुरवठ्याचा टॅंकर, डोंगरतळा येथे मनरेगांतर्गतची कामे, सावळी येथील वनीकरण रोपवाटिकेची तपासणी केली. गडदगव्हाण येथे सिद्धेश्वर धरणातून होत असलेल्या अनधिकृत पाणीउपाशाची माहितीही त्यांनी घेतली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agriculture Department: अधिकाऱ्यांच्या गैरहजेरीमुळे आरोपी सुटतात निर्दोष

Crop Insurance Scam: विनयकुमार आवटेंची ‘एसआयटी’ चौकशी करा

Betel Leaf Rate: खाऊच्या पानांच्या दरात घट

Assembly Monsoon Session: सौर पंपांऐवजी वीज पंप देण्याबाबत धोरण आणू: ऊर्जा राज्यमंत्री मेघना बोर्डीकर

Ethanol Blending: जूनमध्ये इथेनॉल मिश्रण पोचले १९.९ टक्क्यांपर्यंत

SCROLL FOR NEXT