विधानसभेसाठी मतदान यंत्रांची सरमिसळ प्रक्रिया पूर्ण
विधानसभेसाठी मतदान यंत्रांची सरमिसळ प्रक्रिया पूर्ण 
मुख्य बातम्या

विधानसभेसाठी मतदान यंत्रांची सरमिसळ प्रक्रिया पूर्ण

टीम अॅग्रोवन

नाशिक  : येत्या विधानसभा निवडणुकीसाठी वापरण्यात येणाऱ्या मतदान यंत्रांची सर्व तांत्रिक प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर मंगळवारी बॅलेट व कंट्रोल युनिट व व्हीव्हीपॅट या मतदान यंत्राची प्रथम सरमिसळ करण्याची पहिल्या फेरीतील प्रक्रिया पूर्ण झाल्याची माहिती जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी दिली. अंबड येथील केंद्रीय वखार महामंडळाच्या वेअर हाउसमध्ये ही प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. जिल्ह्यात प्रत्येक विधानसभा मतदारसंघनिहाय मतदान केंद्राच्या संख्येपेक्षा बॅलेट युनिट, कंट्रोल युनिट, व्हीव्हीपॅट यंत्रे हे २० व ३० टक्के अधिक प्रमाणात संबंधित मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना वितरित करण्यात आली आहेत. संगणकीय प्रणालीच्या साह्याने सरमिसळ प्रक्रियेची पहिली फेरी पूर्ण करण्यात आल्याची सविस्तर माहिती या वेळी त्यांनी दिली.  या वेळी निवडणूक निर्णय अधिकारी कुंदन सोनवणे, मतदानयंत्र व्यवस्थापन समितीचे नोडल अधिकारी मनोज घोडे पाटील, उपायुक्त महानगरपालिका, तहसीलदार प्रशांत पाटील आदी उपस्थित होते. निवडणूक आयोगाने विकसित केलेल्या ईएमएस यामध्ये सर्व प्रकारच्या ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट नोंद घेऊन मतदारसंघनिहाय वितरित करण्यात येते. ही प्रणाली अचूक व पारदर्शक तत्त्वावर निर्माण करण्यात आली असल्याचे मांढरे यांनी सांगितले. सरमिसळ प्रक्रियेअंतर्गत मतदारसंघनिहाय यंत्राचे वाटप होणार असून, व्हीव्हीपॅट यंत्र वाहतूक करताना अत्यंत काळजीपूर्वक हाताळणे आवश्यक आहे. मतदान केंद्रापर्यंत व्हीव्हीपॅट मशिन नेताना ते ट्रान्सपोर्ट मोडमध्ये असणे गरजेचे असल्योचही सांगितले. विधानसभा मतदारसंघनिहाय १५ मतदारसंघात ४५७९ मतदान केंद्रांना प्रत्येकी ५५०१ बॅलेट व कंट्रोल युनिट आणि ५९६१ व्हीव्हीपॅट यंत्रांचे वाटप करण्यात आले आहे. या वेळी जिल्ह्यातील सर्व नायब तहसीलदार व निवडणूकप्रक्रियेशी संबंधित सर्व कर्मचारी उपस्थित होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Rain : तीन जिल्ह्यांना गारपीटीचा इशारा; राज्यातील काही भागात वादळी पावसाचा अंदाज

Water Circulation : पाणी आवर्तनासाठी उपोषण सुरूच

Orchard Cultivation : फळबाग लागवडीत ४१८ हेक्टरने घट

Non-Basmati White Rice Exports : भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; पाठवला जाणार १४००० टन बिगर-बासमती पांढरा तांदूळ

Index of Seasonal Migration : हंगामी बाह्य स्थलांतराचा निर्देशांक

SCROLL FOR NEXT