उत्तर भारतातील सखल भागात थंडीची लाट 
उत्तर भारतातील सखल भागात थंडीची लाट  
मुख्य बातम्या

उत्तर भारतातील सखल भागात थंडीची लाट 

वृत्तसेवा

नवी दिल्ली : उत्तर भारतातील सखल भागात येत्या चार दिवसात थंडीची लाट येण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. यादरम्यान किमान तापमान सामान्य तापमानापेक्षा कमी राहण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. पंजाब, हरियानाचा काही भाग, चंडीगड, दिल्ली, उत्तर प्रदेश आणि उत्तराखंड येथे गारठा वाढू शकतो.  माउंट आबूसह राजस्थानात अनेक जिल्ह्यात कडाक्याची थंडी पडत आहे. माउंट आबूत चोवीस तासात किमान तापमान अडीच अंशाने घसरून उणे २ वर पोचले आहे. याठिकाणी कमाल तापमान २३.४ अंश सेल्सिअस इतके आहे. काल सिरोहीचे किमान तापमान दोन अंशांने घसरून ७ अंशावर पोचले आणि कमाल तापमान २५ अंश सेल्सिअस होते.  पाटण्याचे तापमान घसरले  पश्‍चिम भागातून थंड वारे येत असल्याने आणि काही ठिकाणी ढगाळ वातावरण असल्याने बिहारच्या सर्वच जिल्ह्यात काल दाट धुके पडले होते. त्यामुळे पाटण्यात दृष्यमानता १०० मीटर नोंदली गेली. त्याचवेळी गंगा आणि सोनच्या परिसरात दृष्यमानता ही ५० ते ७५ मीटर होती. काल सकाळी ऊन पडले होते. परंतु दुपारी पाऊस आल्याने वारे वेगात वाहू लागले. त्यामुळे पारा ७ अंशांपर्यंत घसरला.  हरियानात तापमान २ अंशावर  हरियानात थंडी वाढत असून काल रात्री रेवाडीत तापमान २ अंश सेल्सिअस, हिसार येथे २.२ आणि नारनौल येथे २.८ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले. हिमाचलमध्ये मनालीत २.४ तर सिमला येथे ७.५ अंश सेल्सिअसपेक्षा कमी तापमान होते. पंचकुला येथे ११.३, कर्नाल येथे १२.४ आणि अंबाला येथे १२.६ अंश सेल्सिअस तापमान राहिले. अनेक भागात दृष्यमानता शून्यावर पोचले होते.  पंजाबमध्ये थंडीची लाट कायम  पंजाबमध्ये ३० जानेवारीपर्यंत थंडीची लाट कायम राहण्याची शक्यता आहे. १९९८ नंतर प्रथमच राज्याला थंडीच्या लाटेला सामोरे जावे लागत आहे. पुढील पाच दिवस थंडीच्या लाटेमुळे दाट धुके पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे रात्री तापमानात आणखी घसरण होऊ शकते. १९०१ पासून लोहडीनंतर थंडी कमी होत जाते. परंतु यंदा स्थिती वेगळी आहे.  दिल्ली-एनसीआरमध्ये थंडी  दिल्ली-एनसीआरमध्ये थंडी कायम असून काल दिल्लीत किमान तापमान ४.१ अंश सेल्सिअस नोंदले गेले. थंड वाऱ्यामुळे नागरिक गारठले आहेत. त्याचवेळी १५ ते ३० किलोमीटर प्रती तास वेगाने वारे वाहत असल्याने हवेतील दर्जा सुधारला आहे. येत्या काही दिवसांत राजधानीत आणखी पारा घसरण्याची शक्यता आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Accident Insurance Scheme : अपघात विमा योजनेतून ४५० शेतकरी कुटुंबांना मदत

Banana Sunburn : उन्हाच्या तीव्रतेमुळे जळताहेत केळीची रोपे

Summer Heat : मालेगावात वैशाखाआधीच वणवा

Adulterated Milk : भेसळयुक्त दूध रोखण्यासाठी उपाययोजना कराव्यात

Water Scarcity : कळंबा परिसरात पाण्याचा प्रश्‍न गंभीर

SCROLL FOR NEXT