कोकण, मध्य महाराष्ट्रात थंडी; विदर्भात अवकाळी पावसाची शक्यता
कोकण, मध्य महाराष्ट्रात थंडी; विदर्भात अवकाळी पावसाची शक्यता 
मुख्य बातम्या

कोकण, मध्य महाराष्ट्रात थंडी; विदर्भात अवकाळी पावसाची शक्यता

अॅग्रोवन वृत्तसेवा

पुणे ः कोकण आणि मध्य महाराष्ट्रात कोरडे वातावरण असल्याने या भागांत थंडी वाढली आहे. तर मराठवाडा व विदर्भात काही अंशी ढगाळ वातावरण असल्याने थंडी कमी झाली आहे. बुधवारी (ता. २७) सकाळी आठ वाजेपर्यंत निफाड येथे नीचांकी ९ अंश सेल्सिअस तापमान नोंदविले गेले असल्याचे हवामान विभागाच्या सूत्रांनी सांगितले.

गेल्या काही दिवसांपासून राज्यातील किमान तापमानात चढ-उतार होत आहे. मध्य महाराष्ट्रात असलेल्या कोरड्या वातावरणामुळे थंडी चांगलीच वाढली आहे. त्यामुळे किमान तापमानाचा पारा पुन्हा नऊ अंश सेल्सिअसपर्यंत खाली आला आहे. येत्या चार ते पाच दिवस या भागांत थंडी कायम राहणार आहे. राज्यातील अनेक भागांत थंडी कमीअधिक स्वरूपात आहे. मागील दोन ते तीन दिवसांपूर्वी किमान तापमान ११ अंश सेल्सिअसपर्यंत होते. परंतु थंडी वाढल्याने त्यात पुन्हा किमान तापमानात घट झाली आहे.

कोकण, मध्य महाराष्ट्रातील थंडीमुळे किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत तीन अंश सेल्सिअसने घट झाली आहे. कोकणात चांगलीच थंडी असल्याने किमान तापमान १४ अंश सेल्सिअसपर्यंत खाली आले आहे. मध्य महाराष्ट्रातील पुणे, नगर, नाशिक, जळगाव भागांत चांगलीच थंडी आहे. त्यामुळे किमान तापमान जवळपास दहा अंश सेल्सिअसपेक्षा खाली उतरले आहे. तर कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर भागांतही किचित थंडी आहे. मराठवाड्यात थंडी कमीअधिक प्रमाणात आहे. त्यामुळे किमान तापमान १४ ते १७ अंश सेल्सिअसच्या दरम्यान आहे. विदर्भातही काही प्रमाणात थंडी आहे. त्यामुळे किमान तापमान १३ ते १७ अंश सेल्सिअसच्या दरम्यान आहे. विदर्भात अवकाळी पावसाची शक्यता ः गेल्या चार दिवसांपासून मराठवाडा, विदर्भ ते छत्तीसगड या दरम्यान कमी दाबाचा पट्टा आहे. हा पट्टा समुद्रसपाटीपासून ९०० मीटर उंचीवर आहे. तसेच मध्य महाराष्ट्राच्या परिसरात चक्रीय स्थितीसाठी पोषक वातावरण आहे. यामुळे आज विदर्भातील भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा या भागांत काही प्रमाणात ढगाळ हवामान राहणार आहे. आज (गुरुवारी) या भागात अवकाळी पावसाच्या सरी पडण्याची शक्यता आहे

बुधवारी (ता.२७) सकाळपर्यंत विविध शहरांतील किमान तापमान, कंसात वाढ, घट झालेले तापमान, अंश सेल्सिअसमध्ये ः मुंबई (सांताक्रूझ) १५.३ (-२), ठाणे १८, अलिबाग १४ (-३), रत्नागिरी १७.२ (-२), डहाणू १४.४ (-३), पुणे १२.५ (१), जळगाव ११.५ (-१), कोल्हापूर १८ (२), महाबळेश्‍वर १४.४ (१), मालेगाव १३ (२), नाशिक १२ (१), निफाड ९, सांगली १७.१ (३), सातारा १४.६ (२), सोलापूर १७.४ (१), औरंगाबाद १४.१ (२), बीड १७.३ (३), परभणी १५.९ (१), परभणी कृषी विद्यापीठ १६.७, नांदेड १७ (२), उस्मानाबाद १६, अकोला १४.७, अमरावती १६ (१), बुलडाणा १४ (-२), चंद्रपूर १७.२ (२), गोंदिया १३.५ (-१), नागपूर १७.१ (३), वर्धा १५.६ (१), यवतमाळ १५ (-१)  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agriculture Update : गुणवत्तापूर्ण बियाणे, खते शेतकऱ्यांना द्या : इटनकर

Summer Weather : परभणीत दिवसाचा पारा ४३ अंशांवर

Water Stock : मराठवाड्यातील उपयुक्त पाणीसाठा ७ ते ८ टक्क्यांवर

Flower Rate : लग्नसराईमुळे फुलांच्या दरांत वाढ

Anandacha Shidha : आनंदाच्या शिध्याची प्रतीक्षा

SCROLL FOR NEXT