राधामोहनसिंह
राधामोहनसिंह  
मुख्य बातम्या

‘हवामान स्मार्ट शेती’ प्रकल्पाला प्रारंभ : राधामोहनसिंह

कोजेन्सिस वृत्तसेवा

नवी दिल्ली : हवामानाच्या लहरीपणामुळे देशातील शेतीला दरवर्षी मोठा फटका बसतो. म्हणून त्या त्या भागातील शेतकऱ्यांना स्थानिक हवामानाची माहिती देऊन त्यांना हवामानपूरक शेती तंत्र वापरता यावे आणि पिकांची उत्पादकताही वाढावी यासाठी सरकारने ‘हवामान स्मार्ट शेती’ प्रकल्पाची सुरवात केली आहे, अशी माहिती केंद्रीय कृषिमंत्री राधामोहनसिंह यांनी दिली.  ते येथे आयोजित शेती २०२२-शेतकऱ्यांचे दुप्पट उत्पन्न शिखर परिषदेत बोलत होते. यावेळी त्यांनी देशातील शेतकऱ्यांना हवामानाच्या लहरीपणामुळे सोसाव्या लागणाऱ्या अडचणींवर मात करण्यासाठीच्या उपाययोजनांची माहिती दिली. कृषिमंत्री सिंह म्हणाले, की आम्ही ‘हवामान स्मार्ट शेती’ प्रकल्पाला देशात या आधीच सुरवात केली आहे. या प्रकल्पांतर्गत शेतकऱ्यांना त्या भागातील हवामानाची अद्ययावत माहिती दिली जाईल. शेतकऱ्यांना हमावान लहरीपणाची माहिती मिळाल्यास त्यांना हवामानपूरक शेती तंत्र वापरणे शक्य होणार आहे. २०१७-१८ च्या आर्थिक सर्वेक्षणात देशात नव्या शेती तंत्राची गरज असल्याचे सांगितले होते. त्यासाठी हवामानपूरक पीक पद्धतीचा अवलंब आणि पाण्याच्या कमी वापरात जास्त उत्पादकता देणारा असा ‘हवामान स्मार्ट शेती’ प्रकल्प राबविण्याची सूचना केली होती.  ‘‘हवामान स्मार्ट शेती’ प्रकल्पातून सरकार शेतकऱ्यांने उत्पन्न कसे वाढविता येईल यावर लक्ष केंद्रित केले आहे. सरकारने शेतकऱ्यांचे उत्पन्न २०२२ पर्यंत दुप्प्ट करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. त्याचाच एक भागा म्हणून देशात ‘हवामान स्मार्ट शेती’ प्रकल्प या आधीच सुरू केला आहे. सरकारला शेती धोरण हे उत्पादन केंद्रित धोरणापासून उत्पन्न केंद्रित धोरणाकडे न्यायचे आहे. सरकार शेतकऱ्यांचे उत्पन्नवाढीसाठी प्रयत्नशील असून शेतीत आधुनिक असे प्रयोग राबविले जातील,’’ असेही कृषिमंत्री सिंह म्हणाले.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Rain : तीन जिल्ह्यांना गारपीटीचा इशारा; राज्यातील काही भागात वादळी पावसाचा अंदाज

Water Circulation : पाणी आवर्तनासाठी उपोषण सुरूच

Orchard Cultivation : फळबाग लागवडीत ४१८ हेक्टरने घट

Non-Basmati White Rice Exports : भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; पाठवला जाणार १४००० टन बिगर-बासमती पांढरा तांदूळ

Index of Seasonal Migration : हंगामी बाह्य स्थलांतराचा निर्देशांक

SCROLL FOR NEXT