उन्हाचा पश्‍चिम भागातील लिंबू बागांना फटका
उन्हाचा पश्‍चिम भागातील लिंबू बागांना फटका 
मुख्य बातम्या

उन्हाचा पश्‍चिम भागातील लिंबू बागांना फटका

टीम अॅग्रोवन

जळगाव : पारोळा, भडगाव व परिसरांत वाढत्या उन्हाचा लिंबू बागांना फटका बसला आहे. या बागा वाचविण्यासाठी शेतकरी धावपळ करीत आहेत. सुमारे ४५० एकरांवरील बागा करपल्या आहेत. याबाबत कृषी विभागाने मार्गदर्शन करण्याची गरज आहे.  तामसवाडी, टोळी, तरडी, बोळे, सावखेडा, करमाड, सावरखेडा, कराडी भागांतील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात लिंबू लागवड केली आहे. मात्र, पुरेसा पाऊस न झाल्याने विहिरींनी दिवाळीपासून तळ गाठला आहे. बहुतांशी विहिरी आटू लागल्या असून, बागेला वाचवायचे कसे, असा प्रश्‍न शेतकऱ्यांपुढे उभा ठाकला आहे. काही मोठे व श्रीमंत शेतकरी टॅंकरने पाणी आणून बाग वाचविण्याची धडपड करीत आहेत. मात्र, वाढत्या उन्हाने व तीव्र पाणीटंचाईने लिंबूची वाढ खुंटली आहे. यामुळे छोटे फळ परिपक्व व मोठ्या होण्याच्या प्रमाणात घट झाली आहे. शेतकऱ्यांना नाइलाजास्तव छोटे लिंबू बाजारात विक्रीसाठी न्यावे लागत आहेत. पण त्यांना भाव नाही. परिणामी, शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे.  पारोळा, भडगाव तालुक्‍यांतील लिंबूची पाठवणूक मुंबई, ठाण्यातही होते. तसेच अनेकजण जळगाव, धुळ्यातील बाजार समितीत लिंबू विक्रीसाठी आणतात. परंतु सध्या ऊन आणि कमी पाणी यामुळे बागांचे सिंचन करणे शक्‍य होत नसल्याचे चित्र आहे. परिणामी, लहान बागा वाळू लागल्या आहेत. लाखो रुपयांचे नुकसान शेतकऱ्यांना सहन करावे लागत आहे.  आमच्या भागातील लिंबू बागांना उन्हाचा फटका बसला असून, उष्णता दिवसागणिक वाढतच आहे. भडगाव तालुक्‍यात गिरणा काठावरील गावांमध्ये स्थिती बरी आहे. परंतु गुढे व खेडगावच्या पूर्व भागात हवे तसे पाणी नाही. यामुळे नुकसान होत आहे.  - राकेश मराठे, शेतकरी, भडगाव

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Climate Change : हवामान बदलाचा फळबागेला जोरदार फटका

Indian Politics : गांधींचा वारसा, मोदींचा आरसा

Delhi Farmers' protest : शेतकरी आंदोलनाचा थर्मल प्लांटला फटका; कोळसा पुरवठा बंद, अनेक रेल्वे गाड्या रद्द

Devgad Hapus : बॉक्स देवगड हापूसचा पण आंबा कर्नाटकचा, ग्राहकांची उघड लूट

Market Trend : बाजारकलासाठी हवामान, नवीन सरकारकडे लक्ष

SCROLL FOR NEXT