Chimney of 'Shri Siddheshwar' at the end of court term 
मुख्य बातम्या

न्यायालयाची मुदत संपल्याने ‘श्री सिद्धेश्‍वर’ची चिमणी पाडा

सोलापूर ः कुमठे येथील श्री सिद्धेश्‍वर सहकारी साखर कारखान्याच्या सहवीज प्रकल्पाच्या चिमणी पाडकामाची प्रक्रिया २४ जानेवारीपर्यंत थांबवावी, असे मुंबई उच्च न्यायालयाने आदेश दिले होते. त्या स्थगितीची मुदत २४ जानेवारीला संपली.

टीम अॅग्रोवन

सोलापूर ः कुमठे येथील श्री सिद्धेश्‍वर सहकारी साखर कारखान्याच्या सहवीज प्रकल्पाच्या चिमणी पाडकामाची प्रक्रिया २४ जानेवारीपर्यंत थांबवावी, असे मुंबई उच्च न्यायालयाने आदेश दिले होते. त्या स्थगितीची मुदत २४ जानेवारीला संपली. त्यामुळे महापालिकेने चिमणी पाडकामाची प्रक्रिया राबवावी, अशा मागणीचे निवेदन सोलापूर विचार मंचने महापौरांना दिले. त्यानंतर महापौर श्रीकांचना यन्नम यांनी तसे पत्र आयुक्त पी. शिवशंकर यांना दिले आहे. 

सोलापूरच्या विमानतळाला अडथळा ठरणाऱ्या या चिमणीवरून गेल्या काही वर्षांपासून सातत्याने वाद सुरू आहे. न्यायालयीन आणि प्रशासकीय प्रक्रियेतील सर्व टप्पे या विषयाने पार केले आहेत. प्रत्येक वेळी कारवाईचा आदेश आणि त्यावर न्यायालयाच्या स्थगिती आदेशाने या विषयावर सर्वांचीच उत्सुकता ताणली गेली आहे.

गेल्याच आठवड्यात मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या स्थगितीची मुदत संपल्यामुळे महापालिकेने पुढील कारवाई करणे गरजेचे आहे. त्याचप्रमाणे कारखान्याने केलेल्या प्रदूषणाबद्दल केंद्रीय प्रदूषण मंडळाने चौकशी करण्याचेही सांगितले आहे. 

याची सविस्तर माहिती सोलापूर विचार मंचने २५ जानेवारीला महापौरांना दिली. सर्व कागदपत्रे पाहून आणि पडताळणी करून महापौर श्रीकांचना यन्नम यांनी चिमणी पाडकामाबाबत आयुक्तांना २७ जानेवारी रोजी पत्र पाठविले. त्यामुळे आता पुढे काय होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Livestock Market: खानदेशातील पशुधन बाजारांत गजबज

Akola Heatwave: अकोल्यात उन्हाचा पारा वाढल्याने घामाच्या धारा

Water Shortage: फुलवडे येथील पाझर तलावाने गाठला तळ

Banana Farming Crisis: पार्डी शिवारात केळीची तीन हजार झाडे कापली

Women Farmer Story: महिला पशुपालकांनी शोधलाय इंधन स्वयंपूर्णतेचा मार्ग

SCROLL FOR NEXT