कोठली (ता. नंदुरबार) येथील एका शेतकऱ्याच्या शेतात मिरचीची पाहणी करताना केव्हीकेचे तज्ज्ञ.
कोठली (ता. नंदुरबार) येथील एका शेतकऱ्याच्या शेतात मिरचीची पाहणी करताना केव्हीकेचे तज्ज्ञ. 
मुख्य बातम्या

मिरची आगाराला लागली घरघर

Chandrakant Jadhav

नंदुरबार ः खानदेशी मिरचीचे आगार म्हणून प्रसिद्ध असलेल्या नंदुरबार जिल्ह्यात यंदा कीड-रोग व इतर कारणांमुळे उत्पादनात निम्म्याने घट आली आहे. मिरचीचा तुटवडा जाणवत असून, दरात काहीशी वाढ झाली आहे. परंतु उत्पादन खर्च व उत्पन्न यात मोठी तफावत असून, किरकोळ नफ्यावर यंदा मिरचीचे दहा महिन्यांचे पीक घेण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.  जिल्ह्यात नंदुरबार तालुक्‍यात दरवर्षी सर्वाधिक ८०० ते १००० हेक्‍टरवर मिरचीची लागवड होते. त्यापाठोपाठ शहादा तालुक्‍यात ६० ते ७० हेक्‍टर आणि तळोदा तालुक्‍यातही २० ते २५ हेक्‍टर लागवड असते. यंदा एकूण ११०० हेक्‍टरवर लागवड झाली होती. नंदुरबार तालुक्‍यात कोठली, बामडोद, पिंपळोद आदी भागात तर शहादा येथे कहाटूळ, जयनगर, बामखेडा भागात किरकोळ स्वरूपात लागवड झाली होती.  विषाणूजन्य रोगांचा फटका मिरचीची लागवड जून व जुलैमध्ये झाली. मार्चपर्यंत पीक घेतले जाते. परंतु यंदा सप्टेबर, ऑक्‍टोबरमध्ये एवढे विषाणूजन्य रोग वाढले की, अनेक शेतकऱ्यांना वाढता उत्पादन खर्च आणि असमाधानकारक पीक यामुळे पीक उपटून क्षेत्र रिकामे करावे लागले. सुमारे ५०० ते ६०० हेक्‍टरवरील पीक उपटून क्षेत्र रिकामे झाल्याची माहिती आहे. 

दरवाढीचा दिलासा मिरचीला एकरी किमान ५० ते ६० हजार रुपये खर्च आला आहे. १० महिन्यांचे हे पीक असून, यंदा तोडेही उशिरा सुरू झाले. सध्या तोडे सुरू आहेत, मार्चपर्यंत एकरी ८० ते ९० क्विंटल उत्पादन येईल. खर्च वगळता ३० हजार रुपये नफा एकरी सुटू शकतो, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.  पथाऱ्यांना सुरवात नंदुरबारची मिरची मुंबईपर्यंत प्रसिद्ध आहे. मिरची खरेदी करून व्यापारी मंडळी नंदुरबार शहरात धुळे चौफुलीपुढील शहादा बायपासनजीक पथाऱ्या करून वाळवून घेतात. एप्रिल महिन्यापर्यंत पथाऱ्या राहतील. सुमारे १५ व्यापाऱ्यांनी पथाऱ्या बनविल्या असून, खासगी बाजारात कोरड्या मिरचीला १० हजार रुपये प्रतिक्विंटलचा दर आहे. तर हिरव्या मिरचीची किरकोळ दरवाढ झाली असून, २२०० ते २५०० रुपये प्रतिक्विंटल, असे दर शेतकऱ्यांना मिळत असल्याचे सांगण्यात आले.  मिरचीचे उत्पादन व स्थिती दृष्टिक्षेपात

मिरचीचे सुरवातीचे क्षेत्र  ११०० हेक्‍टर
प्रादुर्भावामुळे रिकामे झालेले क्षेत्र  ६०० हेक्‍टर
अपेक्षित उत्पादन  १५० क्विंटल एकरी 
हाती येणारे उत्पादन   ८० ते ८५ क्विंटल एकरी
उत्पादनातील तूट  एकरी ५० क्विंटल किमान
एकरी सुटणारा नफा  फक्त ३० हजार

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cow Rearing : गोपालनात ऋतुनिहाय बदलांना प्राधान्य

Animal Care : जनावरांमधील धनुर्वातावर उपाययोजना

Ravindranath Tagor : चीनवर मोहिनी घालणारा साहित्यिक

Animal Care : वाढत्या तापमानात जनावरांचे व्यवस्थापन

Lok Sabha Elections : चुरशीने मतदान; सकाळी ९ पर्यंत कोल्हापूर ८.०४ टक्के तर हातकणंगले ७.५५ टक्के मतदानाची नोंद

SCROLL FOR NEXT