मुख्य बातम्या

आयुर्वेद, योग शिक्षणातून पिढी घडवणारा आरोग्यपूजक ः मुख्यमंत्री ठाकरे

आयुर्वेदाचार्य डॉ. बालाजी तांबे यांच्या निधनामुळे आयुर्वेद आणि रोजच्या जगण्यात आहार-विहार आणि विचारांच्या संतुलनाबाबत मार्गदर्शन करणारे आरोग्यपूजक व्यक्तिमत्त्व काळाने हिरावून नेले आहे.

टीम अॅग्रोवन

मुंबई ः आयुर्वेदाचार्य डॉ. बालाजी तांबे यांच्या निधनामुळे आयुर्वेद आणि रोजच्या जगण्यात आहार-विहार आणि विचारांच्या संतुलनाबाबत मार्गदर्शन करणारे आरोग्यपूजक व्यक्तिमत्त्व काळाने हिरावून नेले आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे. 

‘‘आयुर्वेद आणि योगाच्या माध्यमातून अनेकांच्या जीवनात आरोग्यदायी बदल घडवण्याचा डॉ. बालाजी तांबे यांनी ध्यास घेतला होता. दर्जेदार औषधनिर्मितीतून त्यांनी आयुर्वेदाचा देश, विदेशातही प्रसार केला. आहार, विहार आणि विचार यांच्या संतुलनातच आरोग्याची गुरुकिल्ली आहे, हा संदेश त्यांनी सहज, सोप्या आणि ओघवत्या पद्धतीने लोकांपर्यंत पोहोचवला. अध्यात्माची आणि आरोग्याची सांगड घालण्यामुळे अनेकांनी त्यांना आपल्या जीवनात गुरूचे स्थान दिले. आयुर्वेदाबाबतचा डोळस दृष्टिकोन निर्माण करण्यात आणि नव्या पिढीत त्याबाबतची गोडी निर्माण करण्यात डॉ. तांबे यांचे मोलाचे योगदान राहिले आहे. त्यांचे हे योगदान सदैव स्मरणात राहील,’’ असे मुख्यमंत्री आपल्या शोकसंदेशात म्हणाले. 

प्रतिक्रिया  आयुर्वेद व योग प्रसार आणि प्रचारासाठी आयुष्य वेचणारे आयुर्वेदाचार्य श्रीगुरू बालाजी तांबे यांच्या निधनाचे वृत्त ऐकून दुःख झाले. श्रीगुरू तांबे यांनी लिखाण तसेच व्याख्यानांच्या माध्यमातून निरामय जीवन जगण्यासाठी लोकांना अखेरपर्यंत मार्गदर्शन केले. योगाप्रमाणेच आयुर्वेदाचे व श्रीमत् भगवद्‌गीतेचे ज्ञान संपूर्ण जगापर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांनी अथक प्रयत्न केले.  - भगतसिंह कोश्‍यारी, राज्यपाल, महाराष्ट्र राज्य  आयुर्वेदाचार्य बालाजी तांबे यांच्या निधनाचे वृत्त ऐकून अतिशय वाईट वाटले. त्यांच्या निधनाने एक ऋषितुल्य व्यक्तिमत्त्व हरपले आहे. माझा त्यांच्याशी वैयक्तिक स्नेह होता. आयुर्वेद आणि प्राचीन भारतीय चिकित्सा पद्धती यावरील अभ्यास आणि संशोधनात त्यांनी दिलेले योगदान अतुलनीय! बालाजी तांबे यांनी आयुर्वेद आणि अध्यात्म यावर अतिशय विपुल लेखन केले आणि विविध भाषांमध्ये त्याचा अनुवाद झाला. विशेषत: स्त्रियांच्या आरोग्य क्षेत्रात सुद्धा त्यांनी मोठे काम केले. योग, संगीतोपचार असे विविध प्रयोग त्यांनी केले. त्यांचे माध्यमांतील लेख वा मुलाखती या विचारप्रवर्तक असायच्या आणि म्हणूनच त्या लोकप्रिय ठरल्या. श्रोत्याला त्या मानसिक समाधान-आधार देणाऱ्या असायच्या. मी त्यांना श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबीयांच्या दु:खात आम्ही सारे सहभागी आहोत.  - देवेंद्र फडणवीस, माजी मुख्यमंत्री 

ज्येष्ठ आयुर्वेदाचार्य बालाजी तांबे यांना माझी भावपूर्ण श्रद्धांजली. आयुर्वेद, योग, संगीतोपचार विषयांतील तज्ज्ञ श्रीगुरू बालाजी तांबे यांचे आयुर्वेदिक औषधी शास्र विषयातील संशोधनात मोलाचे योगदान राहिले आहे.  - नितीन गडकरी, केंद्रीय दळणवळण मंत्री 

आयुर्वेदाचार्य श्रीगुरू बालाजी तांबे यांनी अध्यात्म, आयुर्वेद, योगोपचार, संगीतोपचारासारख्या पारंपरिक भारतीय उपचारपद्धतींचं पुनरुज्जीवन केलं. आयुर्वेद, योगोपचारांना राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय कीर्ती, लोकप्रियता मिळवून दिली. आयुर्वेदाचं महत्त्व घराघरांत पोहोचवलं. स्वयंपाकघरातल्या वस्तूंचे आयुर्वेदिक गुण गृहिणींना समजावून सांगितले. त्यांनी आयुर्वेदाचं महत्त्व सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी हजारो लेख लिहिले. दूरचित्रवाणीवरून संवाद साधला. आयुर्वेदातील गुणकारी औषधं त्यांचा उपयोग याचं ज्ञान देशविदेशात पोहोचवलं. त्यांच्या निधनानं महाराष्ट्राच्या आध्यात्मिक, सांस्कृतिक, साहित्यिक, वैद्यकीय क्षेत्रातलं ऋषितुल्य व्यक्तिमत्त्व हरपलं आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो.  - अजित पवार, उपमुख्यमंत्री  वैश्‍विक कुटुंब आज पोरके झाले  ज्येष्ठ आयुर्वेदाचार्य आणि योगतज्ज्ञ डॉ. बालाजी तांबे यांच्या निधनाचे वृत्त दुःखद आहे. चिंतनशील मार्गाने अथक केलेली योगसाधना आणि आत्मसंतुलनाचा त्यांनी दाखवलेला मार्ग त्यांच्या असंख्य भारतीय आणि पाश्‍चात्त्य अनुयायांना सकारात्मक जीवनशैलीचा अवलंब करण्यासाठी पथदर्शी ठरला आहे. वैयक्तिक पातळीवर मी त्यांचे आयुर्वेदिक उपचार घेऊन त्यांचा स्नेह अनुभवला. जिज्ञासू भाव आणि सातत्याने संशोधन यातून त्यांनी आयुर्वेदाला शास्त्रोक्त पद्धतीने जगासमोर मांडले. त्यांचे तत्त्वज्ञान रोजच्या मानवी जगण्याशी एकरूप झाले आहे. त्यांच्या जाण्याने त्यांचे विशाल वैश्‍विक कुटुंब आज पोरके झाले आहे. डॉ. बालाजी तांबे यांना भावपूर्ण श्रद्धांजली!  - शरद पवार, माजी केंद्रीय कृषिमंत्री 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage : अमरावतीत दोन लाख हेक्टरवर नुकसान

Nanded Rain : नांदेडमध्ये सलग दुसऱ्या दिवशी पावसाचा जोर

Rain Crop Damage : नद्या, नाले, ओढ्याकाठच्या पिकांचे शंभर टक्के नुकसान

Raigad River Conservation : रायगडमध्ये नदी संवर्धनाला तिलांजलि

Black Thrips on Chilli: मिरचीवरील ब्लॅक थ्रिप्सच्या एकात्मिक नियंत्रणासाठी सोप्या ४ पद्धती

SCROLL FOR NEXT