Parbhani News : परभणी, हिंगोली जिल्ह्यात पावसाचे थैमान सुरुच असून अतिवृष्टी, पुरामुळे नद्या, नाले, ओढ्या काठच्या जमिनीवरील पिके शंभर टक्के वाया गेली आहेत. सखल जमिनीवरील पिकांची अवस्था वाईट आहे. उत्पादकतेसह मालाच्या दर्जा खालावल्याने शेतकऱ्यांना खूप मोठा आर्थिक बसला आहे. रविवारी (ता. २८) सकाळी साडेआठ पर्यंतच्या २४ तासांत या दोन जिल्ह्यातील २२ मंडलांत अतिवृष्टी झाली. त्यापैकी ६ मंडलात १०० मिमीपेक्षा जास्त पाऊस झाला..परभणी जिल्ह्यात गोदावरी, दुधना, करपरा, पूर्णा, इंद्रायणी, गळाटी, गौतमी आदी नद्याचे पूर तसेच बॅक वॉटरमुळे पिकांची नासाडी झाली. मागील २४४ तासांमध्ये जिल्ह्यात सरासरी ४४.५ मिमी तर सप्टेंबर महिन्यात आजवर सरासरी ३५०.१ मिमी (२२२ टक्के) पाऊस झाला.यंदा १ जून पासून आजवर सरासरी ७५० मिमी अपेक्षित असतांना प्रत्यक्षात ९२० मिमी (१२२.७ टक्के) पाऊस झाला. हिंगोली जिल्ह्यात पूर्णा कयाधू, आसना नद्यांसह ओढे, नाल्याच्या काठच्या वसमत तालुक्यात वसमत शहर तसेच कुरुंदा, पांगरा शिंदे आदी गावांमध्ये पुरांचे पाणी शिरल्याने घरांची पडझड झाली..Rain Crop Damage : सांगलीच्या दुष्काळी तालुक्यांत पावसाचा फटका.संसारउपयोगी वस्तू, अन्नधान्यांची नासाडी झाली. जिल्ह्यात मागील २४ तासांमध्ये सरासरी ५५.५ मिमी तर सप्टेंबर महिन्यांत आजवर सरासरी ३९७ मिमी (२७४.९ टक्के) पाऊस झाला. यंदा १ जून पासून आजवर७८५ मिमी अपेक्षित असतांना प्रत्यक्षात सरासरी १११९.२ मिमी (१४२.६ टक्के) पाऊस झाला. दरम्यान, शनिवारी (ता. २७) दुपारनंतर या दोन जिल्ह्यातील पावसाचा जोर कमी झाला. परंतु जायकवाडी, माजलगाव, येलदरी, सिद्धेश्वर निम्न दुधना धरणातील विसर्गामुळे पूर परिस्थिती निर्माण झाली..लघू, मध्यम प्रकल्प भरले तुडुंबपरभणी ः पाणलोट क्षेत्रीतील जोरदार पावसामुळे परभणी जिल्ह्यातील २२ लघू सिंचन प्रकल्पांमध्ये सरासरी ४०.९८२ दलमघीनुसार ९७ टक्के, तर २ मध्यम प्रकल्पामध्ये सरासरी ५२.०४१ दलघमीनुसार १०० टक्के पाणीसाठा उपलब्ध झाला आहे.जिल्ह्यातील १८ लघू सिंचन प्रकल्प १०० टक्के भरले आहेत.करपरा व मासोळी मध्यम प्रकल्पांच्या सांडव्यावरुन पाणी ओसंडून वाहत आहे. .Rain Crop Damage : २८ हजार हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रातील पिकांना अतिवृष्टीचा फटका.जायकवाडी पाटबंधारे विभागांतर्गत परभणी जिल्ह्यातील २१ व जालना जिल्ह्यातील लघू सिंचन प्रकल्पांची पूर्ण जल क्षमता सरासरी ४५.८२७ दलघमी, तर उपयुक्त पाणीसाठा क्षमता ४२.२०५ दलघमी आहे.करपरा मध्यम प्रकल्पाची पूर्ण जल क्षमता २८.८२० दलमघी असून त्यापैकी उपयुक्त साठा क्षमता २४.९०० दलघमी आहे. मासोळी मध्यम प्रकल्पाची पूर्ण जल क्षमता ३४.०८५ दलघमी असून त्यापैकी उपयुक्त साठा २७.१४१ दलघमी आहे..पावसाचा खंड नसल्यामुळे शेतात गुडघाभर पाणी साचले आहे. सोयाबीनची काढणी शक्य नाही. दाणेही काळवंडले आहेत. झेंडू, कपाशी, हळद पिकांची मोठी हानी झाली आहे. गावामध्ये पाणी शिरल्यामुळे अन्नधान्याची नासाडी झाली. तत्काळ मदत द्यावी.सोपान शिंदे, पांगरा शिंदे, ता. वसमत, जि. हिंगोली. .गळाटी नदीच्या पुरात आमच्या गावातील ५० टक्केहून पिके बुडाली. गोदावरी नदी भरून वाहत असल्यामुळे गळाटी नदीचे बॅक वॉटर शेतामध्ये पसरत आहे. त्यामुळे गावात पाणी शिरू शकते. सोयाबीन पूर्णपणे कुजून गेले.पशुपतिनाथ शेवटे, सिरपूर, ता. पालम, जि. परभणी..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.