पारंपरिक उत्साहात शिवजयंती साजरी
पारंपरिक उत्साहात शिवजयंती साजरी 
मुख्य बातम्या

पारंपरिक उत्साहात शिवजयंती साजरी

टीम अॅग्रोवन

पुणे : संपूर्ण महाराष्ट्रासह देश-विदेशात अनेक ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती सोमवारी (ता. १९) मोठ्या उत्साहात साजरी करण्यात अाली. शिवनेरी या शिवरायांच्या जन्मस्थळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मंत्रिमंडळ सदस्यांनी शिवजन्म सोहळ्यास सहभाग नोंदविला. नवी दिल्लीतही महाराष्ट्र सदनासह विविध भागांत शिवजयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय,’ ‘जय भवानी-जय शिवाजी’ अादी जयघोषांनी शहरांसह गावे दुमदुमून गेली होती. शिवजयंतीनिमित्त विविध सांस्कृतिक आणि सामाजिक उपक्रमांचे राज्यात अायोजन करण्यात आले. पुण्यात शिवकालीन मनसबदार घराण्यांसह विविध संघ-संघटनांनी शिवजयंतीनिमित्त विशेष कार्यक्रम, शौर्य उपक्रम, मिरवणुकांचे आयोजन केले होते. शिवजयंतीनिमित्त शिवनेरी गडावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत शिवजन्मोत्सव सोहळा पार पडला. या वेळी ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे, शिक्षणमंत्री विनोद तावडे, पर्यटनमंत्री जयकुमार रावल, आमदार शरद सोनावणे, विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी, विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील, जिल्हाधिकारी सौरभ राव, जिल्हा पोलिसप्रमुख सुवेझ हक उपस्थित होते. या वेळी शिवजन्माचा पाळण्याचा पारंपरिक साेहळा साजरा झाला. फडणवीस यांनी शिवछत्रपतींची पालखी घेऊन त्यातील शिवप्रतिमेला पुष्पहार अर्पण केला. नवी दिल्लीत महाराष्ट्र सदनात पहिल्यांदाच शिवजयंती सोहळा पार पडला. यास छत्रपती संभाजीराजे, केंद्रीय मंत्री रामदास आठवले अादी उपस्थित होते. यानंतर मिरवणूकही काढण्यात आली. सोशल मीडियावर शिवजयंती सोहळ्याच्या थेट प्रक्षेपणाचा देशासह जगभरातील भारतीयांना लाभ घेता आला. दिवसभर शिवरायांना अभिवादन करणारे संदेश आणि विषयांनी हे माध्यम गजबजून गेले होते.

‘‘शिवरायांचे गड किल्ले हे जागत इतिहास असून प्रेरणास्राेत आहेत. त्यामुळे सांस्कृतिक विभागाकडून २८ किल्ल्यांच्या संवर्धनाचे काम हाती घेतले असून, त्यासाठी १२८ काेटींचा निधी मंजूर केला आहे.’’ - विनोद तावडे, शिक्षणमंत्री   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Indian Politics : गांधींचा वारसा, मोदींचा आरसा

Delhi Farmers' protest : शेतकरी आंदोलनाचा थर्मल प्लांटला फटका; कोळसा पुरवठा बंद, अनेक रेल्वे गाड्या रद्द

Devgad Hapus : बॉक्स देवगड हापूसचा पण आंबा कर्नाटकचा, ग्राहकांची उघड लूट

Market Trend : बाजारकलासाठी हवामान, नवीन सरकारकडे लक्ष

Storm Hits Meghalaya's : मेघालयात १३ गावांमध्ये घरांचे नुकसान, ४०० हून अधिक लोक बाधित

SCROLL FOR NEXT