Chance of light rain for a week in the state
Chance of light rain for a week in the state 
मुख्य बातम्या

राज्यात आठवडाभर हलक्या पावसाची शक्यता

टीम अॅग्रोवन

पुणे : कोकणसह राज्यातील काही भागांत पावसाने बऱ्यापैकी हजेरी लावली. त्यानंतर पावसाचा प्रभाव कमी झाला आहे. येत्या पाच ते सहा दिवस राज्यात तुरळक सरी पडण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी अंशतः ढगाळ वातावरण राहणार असून पुढील आठवड्यात पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.

पावसामुळे तापमानात चांगलीच घट झाली आहे. कमाल तापपानाबरोबर किमान तापमानात बऱ्यापैकी घट झाली आहे. त्यामुळे उकाडा कमी झाला आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भाच्या काही भागात काही प्रमाणात ऊन पडत आहे. मात्र, ढगाळ वातावरणामुळे उन्हाचा चटका नागी. सोमवारी (ता. २१) सकाळच्या आठ वाजेपर्यंत विदर्भातील ब्रम्हपुरी येथे ३५.८ अंश सेल्सिअसची सर्वाधिक कमाल तापमानाची नोंद झाली. सध्या बहुतांशी भागात तापमान हे सरासरीएवढे आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात तुरळक ठिकाणी तापमानात वाढ झाली आहे. विदर्भातही पारा कमीच आहे. विदर्भात कमाल तापमानात २९ ते ३५ अंश सेल्सिअसच्या दरम्यान होते. मराठवाड्यातही ३३ अंश सेल्सिअस, मध्य महाराष्ट्रात तापमान २० ते ३५ अंश, तर कोकणात ३१ ते ३२ अंश सेल्सिअसच्या दरम्यान होते.

कोकणात पावसाची उसंत कोकणात जवळपास आठवडाभर मुसळधार पाऊस कोसळल्यानंतर रविवारपासून जोर ओसरला आहे. सोमवारी (ता. २१) कोकणासह मध्य महाराष्ट्रातील पावसाने चांगलीच उसंत दिली आहे. तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला. त्यामुळे नद्यांतील पाणी पातळी कमी होऊ लागली आहे. वाढलेल्या पाणीपातळीमुळे अनेक ठिकाणी नुकसान झाल्याने शेतकऱ्यांना चांगलाच फटका बसला आहे. खानदेश, मराठवाडा व विदर्भात दिवसभर ऊन्हासह काही प्रमाणात ढगाळ वातावरण होते. 

राज्यात सोमवारी (ता. २१) सकाळी आठ वाजेपर्यंत मंडळनिहाय पाऊस, मिलिमीटर : स्त्रोत - हवामान विभाग  कोकण : जव्हार ३५, माणगाव ३८, म्हसळा ४७, मुरूड ६३, रोहा ३०, श्रीवर्धन ६६, सुधागडपाली ३०, तळा ६३, उरण ६७, देवगड ४६, दोडामार्ग ५३, कणकवली ४८, ठाणे ३६.

या जिल्ह्यांमध्ये होणार जोरदार पाऊस   बुधवार ः भंडारा, नागपूर, गडचिरोली, चंद्रपूर, गोंदिया गुरुवार ः भंडारा,नागपूर, गडचिरोली, चंद्रपूर, गोंदिया

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cow Rearing : गोपालनात ऋतुनिहाय बदलांना प्राधान्य

Animal Care : जनावरांमधील धनुर्वातावर उपाययोजना

Ravindranath Tagor : चीनवर मोहिनी घालणारा साहित्यिक

Animal Care : वाढत्या तापमानात जनावरांचे व्यवस्थापन

Lok Sabha Elections : चुरशीने मतदान; सकाळी ९ पर्यंत कोल्हापूर ८.०४ टक्के तर हातकणंगले ७.५५ टक्के मतदानाची नोंद

SCROLL FOR NEXT