केंद्रीय पथकाकडून कापूस पिकाची पाहणी 
मुख्य बातम्या

केंद्रीय पथकाकडून कापूस पिकाची पाहणी

गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव झाल्याने पुसद तालुक्यातील कापूस पीक उद्‍ध्वस्त झाले.

टीम अॅग्रोवन

आरेगाव, यवतमाळ ः गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव झाल्याने पुसद तालुक्यातील कापूस पीक उद्‍ध्वस्त झाले. याच बाधित कपाशी पिकाची पाहणी करण्यासाठी केंद्रीय एकात्मिक पीक व्यवस्थापन केंद्राच्या पथकाने वरुड येथील शेतात कापूस व तूर पिकांची पाहणी केली. या पथकात एस. महेश, नटराज कारोतीया यांचा समावेश होता. वरुड येथील इंदूबाई माधव पडघणे यांच्या शेतात भेट देऊन पथकातील सदस्यांनी पीक परिस्थितीची पाहणी केली. या वेळी त्यांनी शेतकऱ्यांकडून समस्या जाणून घेतल्या. कापसाच्या बोंडात गुलाबी बोंड अळी असून, पहिल्या वेच्यानंतरच कापसाची अवस्था वाईट आहे, असे उपस्थित शेतकऱ्यांनी पथकातील सदस्यांना सांगितले. तसेच नुकत्याच येऊन गेलेल्या हलक्या पावसाने व ढगाळ वातावरणाने तुरीलाही धोका निर्माण झाला आहे, असे सांगितले. या वेळी पथकासमवेत तालुका कृषी अधिकारी शुभम बेरड, मंडळ कृषी अधिकारी भारत चेके, कृषी सहायक पी. जी. चेलमेलवार उपस्थित होते. तालुका कृषी अधिकारी शुभम बेरड यांनी तालुक्यातील कापूस लागवडीचे क्षेत्र व गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव झालेल्या क्षेत्राची माहिती देऊन केलेल्या उपाययोजना पथकाला सांगितल्या. पथकातील सदस्यांनी पीक परिस्थितीबाबत लवकरच अहवाल सादर केल्या जाईल, असे शेतकऱ्यांना सांगितले. पिकांचे नुकसान झालेल्या परिस्थितीत लोकप्रतिनिधींनी शासन दरबारी शेतकऱ्यांना मदत मिळवून देण्यासाठी पाठपुरावा करण्याची गरज आहे. दुर्दैवाने तालुक्याला तीन आमदार असताना एकानेही याप्रश्‍नी भरपाईसाठी पाठपुरावा केला नसल्याची खंत शेतकरी व्यक्त करीत आहेत.  

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Disaster Relief : नैसर्गिक आपत्तीमध्ये मदतीसाठी एनडीआरएफमधून राज्यांना निधी कसा मिळतो?

PM Modi: दिवाळीआधी शेतकऱ्यांना मिळणार ४२ हजार कोटींची भेट, दोन दिवसांत मोठी घोषणा

Farm Mechanization : नांदेडला कृषी यांत्रिकीकरणाचा खर्च केवळ ३० लाख खर्च

Rohit Pawar: अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या न्यायासाठी हिवाळी अधिवेशन तीन आठवड्यांचे घ्यावे: रोहित पवार

Rain Crop Damage : अतिवृष्टीचा ३ लाख ५२ हजार हेक्टरला तडाखा

SCROLL FOR NEXT