संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र 
मुख्य बातम्या

सीसीआय १० लाख कापूस गाठींची खरेदी करणार 

Chandrakant Jadhav

जळगाव ः भारतीय कापूस महामंडळ (सीसीआय) यंदा शासकीय कापूस खरेदी ऑक्‍टोबरमध्ये सुरू करण्यासंबंधी तयारी करीत आहे. यंदा १० लाख गाठींची खरेदी देशभरात विविध खरेदी केंद्रांच्या माध्यमातून केली जाईल, अशी माहिती सीसीआयच्या अध्यक्षा डॉ. पी. अली राणी यांनी ‘ॲग्रोवन’शी बोलताना दिली. 

डॉ. राणी या जैन हिल्स येथे सोमवारी (ता.२३) आयोजित महाकॉट वार्षिक संमेलनात आपली भूमिका मांडण्यासह जिनर्स, व्यापाऱ्यांचे मुद्दे समजून घेण्यासाठी सहभागी झाल्या होत्या. यानिमित्त त्यांच्याशी ‘ॲग्रोवन’ने काही मुद्यांवर चर्चा केली.  ‘‘सीसीआयची खरेदी सध्या हरियानामध्ये सुरू आहे; परंतु तेथे मागील वित्तीय वर्षात जे दर होते, त्याच दरात म्हणजेच ५४५० रुपयात खरेदी केली जात आहे. महाराष्ट्र व इतर भागात अद्याप कापूस घरात आलेला नाही. ही बाब लक्षात घेता ऑक्‍टोबरमध्ये खरेदी सुरू केली जाईल. शक्‍य झाल्यास ही खरेदी नवीन दरानुसार म्हणजेच ५५५० व ५४५० या दरात ऑक्‍टोबरच्या पहिल्या आठवड्यापासून सुरू होऊ शकते. तारीख नेमकी सांगता येणार नाही. कारण यासंबंधीची प्रक्रिया सुरू आहे,’’ असे त्यांनी यासंबंधीच्या प्रश्‍नावर सांगितले.

बोंड अळी व शेतकऱ्यांसंबंधी सीसीआय काय करीत आहे, या मुद्यांवर विचारले असता, ‘‘आपल्याकडे उत्तम दर्जाचा कापूस येतो. आपला कापूस उत्पादनात आघाडीवर आहोत. हे शेतकरी, जिनर्स आदींच्या श्रमामुळे शक्‍य होते. काही प्रश्‍न आहेत; परंतु सीसीआय शेतकऱ्यांचा मजुरी खर्च लक्षात घेऊन त्यांना कापूस वेचणी यंत्र देणार आहे,’’ असा मुद्दा त्यांनी सांगितला. 

नऊ लाख गाठी पडून सीसीआयने मागील हंगामात ११ लाख गाठींची खरेदी केली. नव्या हंगामातही देशात १० लाख गाठींची खरेदी करू. मागील हंगामातील नऊ लाख गाठी पडून आहेत. यातील दोन लाख गाठींची विक्री ई-लिलाव प्रक्रियेतून केली आहे. पारदर्शकपणे यासंबंधीची कार्यवाही केली आहे. पडून असलेल्या नऊ लाख गाठींसंबंधी नुकसान आलेले नाही. कारण आम्ही नफा लक्षात घेऊनच त्यांची विक्री करू. त्यांचे सुरक्षित किंवा व्यवस्थित साठे आम्ही केले आहेत, असेही त्यांनी स्पष्ट केले. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Rain : तीन जिल्ह्यांना गारपीटीचा इशारा; राज्यातील काही भागात वादळी पावसाचा अंदाज

Water Circulation : पाणी आवर्तनासाठी उपोषण सुरूच

Orchard Cultivation : फळबाग लागवडीत ४१८ हेक्टरने घट

Non-Basmati White Rice Exports : भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; पाठवला जाणार १४००० टन बिगर-बासमती पांढरा तांदूळ

Index of Seasonal Migration : हंगामी बाह्य स्थलांतराचा निर्देशांक

SCROLL FOR NEXT