डिजिटल स्वाक्षरीत सुधारित सातबारा वाटपासाठी मोहीम 
मुख्य बातम्या

डिजिटल स्वाक्षरीत सुधारित सातबारा वाटपासाठी मोहीम

राज्यात डिजिटल स्वाक्षरीत सुधारित सातबारा वाटपासाठी आज (ता.२)पासून मोहीम सुरू होत आहे. तसेच महात्मा गांधी जयंतीनिमित्त आज होणाऱ्या विशेष ग्रामसंभांमध्ये महसूल विभागाशी संबंधित ऑनलाइन सेवांची प्रगती मांडली जाणार आहे.

टीम अॅग्रोवन

पुणे : राज्यात डिजिटल स्वाक्षरीत सुधारित सातबारा वाटपासाठी आज (ता.२)पासून मोहीम सुरू होत आहे. तसेच महात्मा गांधी जयंतीनिमित्त आज होणाऱ्या विशेष ग्रामसंभांमध्ये महसूल विभागाशी संबंधित ऑनलाइन सेवांची प्रगती मांडली जावी, जमाबंदी आयुक्त नि. कु. सुधांशू यांनी राज्यातील सर्व विभागीय आयुक्त व जिल्हाधिकाऱ्यांना कळविले आहे.  ग्रामसभांमधून शेतकऱ्यांच्या खाते उताऱ्यांचे वाचन व्हावे, वर्षभरात मंजूर विनातक्रार फेरफार नोंदीची माहिती ग्रामसभेला द्यावी, तसेच ग्रामसभांमध्ये डिजिटल सेवांच्या माहिती देताना या मोहिमेस प्रारंभ करावा, असे जमाबंदी आयुक्तालयाने सुचविले आहे. संगणकीकृत डिजिटल स्वाक्षरीत सुधारित सातबारा उपलब्ध करून देण्यास शासनाने यापूर्वीच हिरवा कंदील दिलेला आहे. त्यामुळे दोन ऑक्टोबरपासून अशा सातबारा वाटपाची विशेष मोहीम सुरू होईल. याचवेळी सुधारित नमुन्याबाबत शेतकऱ्यांना माहिती दिली जाणार आहे.  ई-पीक पाहणीची माहिती द्या... राज्यात १५ ऑगस्टपासून सुरू झालेल्या ई-पीक पाहणी प्रकल्पाची माहिती शेतकऱ्यांना याच ग्राम सभांमधून द्यावी. तसेच पीकपाहणी न केलेल्या खातेदारांच्या यादीचे वाचन करावे, असे आदेश आयुक्तांनी दिले आहेत. महसूल विभागाशी संबंधित इतर ऑनलाइन सेवांची माहितीदेखील ग्रामसभेला देण्यास सुचविले आहे. जिल्हाधिकारी व महसूल आयुक्तांनी क्षेत्रीय अधिकाऱ्यांना या उपक्रमांबाबत स्वतंत्र आदेश द्यावेत, असेही आयुक्तांनी स्पष्ट केले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Monsoon Delay: मॉन्सूनच्या विलंबाने खरीप हंगामाला फटका

SMART Rooftop Solar Scheme: अवघ्या २५०० रुपयांत सौर प्रकल्प

Kharif Sowing: मराठवाड्यात खरीप पेरणी अद्याप रखडलेलीच

Jal Jeevan Mission: ‘जलजीवन’ ठप्प; ४०० कोटींची गरज

Crop Insurance Compensation: पीकविम्याची रक्कम दहा दिवसांत द्या; अन्यथा सरण आंदोलनाचा शेतकऱ्यांचा इशारा

SCROLL FOR NEXT