आडगाव टप्पा, ता. चांदवड : शेतात पावसाचे पाणी साचल्याने कोबीचे झालेले नुकसान.
आडगाव टप्पा, ता. चांदवड : शेतात पावसाचे पाणी साचल्याने कोबीचे झालेले नुकसान. 
मुख्य बातम्या

आडगाव टप्पा येथे शेतात पाणी शिरल्याने कोबीचे नुकसान

टीम अॅग्रोवन

नाशिक : चांदवड तालुक्यातील आडगाव टप्पा येथे विठोबा शंकर घुले यांच्या शेतात पावसाचे पाणी गेल्याने कोबी पिकाचे नुकसान झाल्याचे समोर आले आहे. घुले यांची शेतजमीन रस्त्यापासून ५० मीटर अंतरावर आहे. मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत शेलू-आडगाव -दोनेवाडी या रस्त्यांचे काम प्रगतिपथावर आहे. या रस्त्यांच्या लगत अनेकदा सूचना करूनही ठेकेदाराने चर खोदलेला नाही. त्यामुळे वाहत येणारे पाणी थेट शेतात घुसल्याने दीड एकर क्षेत्रावर लागवड केलेल्या कोबी पिकाचे पाच लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा आरोप जमीनमालक यांनी केला आहे.  मागील आठवड्यात झालेल्या पावसामुळे आडगाव टप्पा येथील हायस्कूल व रस्त्यालगत पाणी जमा झाले. या ठिकाणी काम सुरू असल्याने पाणी जाण्यासाठी मोऱ्या तयार केल्या असून, सिमेंट पाइप बसविण्यात आले आहेत. मात्र, या मोऱ्यांच्या पुलाजवळ सिमेंट पाइपच्या वहन मार्गात दगड-माती पडलेली असल्याने पाण्याच्या मार्गात अडथळा आला. त्यामुळे पाणी वाहण्यासाठी चर किंवा दुसरी जागा नसल्याने पाणी थेट कोबीच्या शेतात घुसले, असे कोबी उत्पादक शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. या पाण्यासोबत माती व गाळ वाहून आल्याने कोबीचे कंद पाण्याखाली गेले. या पिकावर गाळ साचल्याने त्यामुळे शेतीमालाचे मोठे नुकसान झाले असून, पाच लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा दावा कोबी उत्पादक विठोबा घुले यांनी केला आहे.  रस्त्यांचे काम करणाऱ्या ठेकेदाराला चर तयार करण्याबाबत वेळोवेळी सूचना केल्या. मात्र, त्याने दुर्लक्ष केले. ठेकेदाराच्या चुकीमुळे हे सर्व नुकसान झाले आहे. जर नियमाप्रमाणे रस्त्यालगत चर खोदला असता तर पाणी साचले नसते, त्यामुळे नुकसानही झाले नसते. शासनाने नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी घुले यांनी केली आहे. मंगळवारी (ता. २३) मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेचे उपअभियंता जयवंत गवळी यांनी पाहणी केली. त्या वेळी संबंधित शेतकरी व या ठिकाणी आलेल्या अधिकाऱ्यांमध्ये नुकसानभरपाई मिळण्याबाबत बाचाबाची झाली. या वेळी काही शेतकरी फोटो व व्हिडिओ काढत असताना अधिकाऱ्यांनी मज्जाव केला. काही काळ या ठिकाणी तणाव निर्माण झाला होता.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Ethanol Production : कांदा उत्पादकांच्या पाठोपाठ ऊस उत्पादकांनाही सरकारनं घोषणा करून भूलवलं ? | शेतीच्या बातम्या

Maharashtra Rain : राज्यात उष्णतेच्या लाटेचा इशारा; देशातील अनेक भागात तापमानाचा पारा ४२ ते ४६ अंशाच्या दरम्यान

Agriculture Success Story : नैसर्गिक उमाळ्यावर फुलली शेती, बहरले पर्यटन

Horticulture : ‘कोठली’ला मिळाला बागायती चेहरा

Guava Farming : जत तालुक्यात पेरूचे ‘कल्चर’

SCROLL FOR NEXT