Buy cotton at home, demand for female farmer to CM
Buy cotton at home, demand for female farmer to CM 
मुख्य बातम्या

घरातील कापूस खरेदी करा, महिला शेतकऱ्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

टीम अॅग्रोवन

परभणी : उन्हाळा सुरु झाला आहे. तापमानात वाढ होत आहे. या परिस्थितीत घरात कापूस साठवून ठेवणे जोखमीचे झाले आहे. त्यामुळे राज्य कापूस उत्पादक पणन महासंघ आणि सीसीआयतर्फे तत्काळ कापूस खरेदी सुरु करावी, अशी मागणी मांडाखळी (ता.परभणी) येथील महिला शेतकरी सत्यभामा लोहट यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे ई मेलव्दारे केली आहे. 

सत्यभामा लोहट यांनी ई मेल मध्ये म्हटले आहे की, त्यांचा संपूर्ण कापूस अजून घरात आहे. ‘कोरोना’मुळे सध्याची परिस्थिती गंभीर आहे. मुख्यमंत्री उध्द्वव ठाकरे आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याकडून आमच्या आशा आहेत. या संकटसमयी आम्ही तुमच्या सोबत आहोत. परंतु, शेतकऱ्यांची परिस्थिती गंभीर आहे. वर्षभर राबराब राबून खर्च करून घरात आलेला कापूस अजून तसाच घरी आहे. इतर कडधान्य साठवता येईल, परंतु कापूस घरी ठेवणे अत्यंत धोकादायक आहे. 

सध्या ऊन्ह खूप तापत आहे. एखादी ठिणगी पण कापसाची राख करू शकते. हा विचारच फार त्रासदायक आहे. त्यामुळे कापूस खरेदी व्हावा, हीच जिल्ह्यातील शेतकऱ्यांची इच्छा आहे. कारण बऱ्याच दिवसांपासून कापूस खरेदी बंद आहे. माल घरी राहिला, तर नवीन वर्षात बी-बियाणे, खते कशी खरेदी करायची, हा सवाल आहे.  आम्ही मावळे तुमच्यासोबत..

आम्हांला माहीत आहे की, तुम्ही खूप मेहनतीने ‘कोरोना’चा लढा लढत आहात. आम्ही मावळे पण तुमच्या सोबत आहोतच. परंतु, आमच्या कापसाच्या प्रश्नांवर देखील तुम्हीच आमची शेवटची आशा आहात. नक्कीच आपल्या निर्णयाच्या प्रतीक्षेत आहे, असे लोहट यांनी नमूद केले आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cotton Productivity : परभणी जिल्ह्यात कापूस रुईचा उतारा हेक्टरी ३ क्विंटल ९८ किलो

Water Scarcity : करकंब परिसरात द्राक्षबागांना टँकरने पाणी

Dam Water Stock : देशातील मोठी ७ धरणे कोरडी

Agriculture Irrigation : भामा-आसखेडच्या आवर्तनाची प्रतीक्षा

Ethanol Production : इथेनॉल मिश्रणाला बळ देण्याची अमेरिकेची तयारी

SCROLL FOR NEXT