butterfly  
मुख्य बातम्या

‘फुलपाखरू उद्यान’ ठरतेय आकर्षण  

सप्टेंबर महिना हा फुलपाखरांच्या संरक्षण आणि संवर्धनासाठी ‘बटरफ्लाय मंथ’ म्हणून साजरा केला जातो.

टीम अॅग्रोवन

नाशिक : सप्टेंबर महिना हा फुलपाखरांच्या संरक्षण आणि संवर्धनासाठी ‘बटरफ्लाय मंथ’ म्हणून साजरा केला जातो. या निमित्ताने नाशिक जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संस्था संचलित निफाड येथील कर्मवीर गणपत दादा मोरे कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयात ‘फुलपाखरू उद्यान’ उभारण्यात आले आहे. या उद्यानात येणारे विविध प्रकारचे फुलपाखरे महाविद्यालयाची शोभा वाढवत आहे. ‘बटरफ्लाय मंथ’ निमित्त महाविद्यालयात प्राणीशास्त्र आणि वनस्पतिशास्त्र विभागातर्फे साकारलेल्या उद्यानात फुलपाखरांच्या ३० वेगवेगळ्या प्रजाती आहेत. या दरम्यान फुलपाखरांच्या जीवनाचे विविध टप्पेदेखील बघायला मिळाले आहेत. उद्यानातील सर्व फुलपाखरांच्या प्रजाती कडीपत्ता, सोनचाफा, पळस, शंकासूर, खैर, सीताफळ, बहावा, वेल, लिंबू, पाडरा कुडा, सागरगोटा, कांचन, सदाफुली, जास्वंद, एक्झोरा, हळदीकुंकू, पानफूटी, आपटा, रुई या झाडांवर आढळल्या आहेत.‘वाईल्ड लाईफ हेरीटेज कोन्झरवेशन’चे सदस्य अनिल माळी यांच्या संकल्पनेनुसार महाविद्यालयात ६ सप्टेंबरला फुलपाखरू उद्यान उभारले गेले.  यासाठी प्राचार्य डॉ. रवींद्र भवरे, प्राणिशास्त्र विभागाच्या प्रा. मोनिका बोराडे, प्रा. योगीता तेलंगे, वनस्पतिशास्त्र विभागाच्या प्रमुख प्रा. दीपिका जेउघाले, प्रा. मोहिनी कारे तसेच शिक्षकेतर कर्मचारी महेश भरते, दीपक भंडारे, राहुल चांदोरे आदींनी प्रयत्न केले आहेत.

उद्यानात विविध प्रकारची फुलपाखरे  तेल्ड जे, कॉमन जे, कॉमन लाईस, कॉमन मॉरमॉन, कॉमन इमीग्रंट, कॉमन ग्रास येलो, सायकी, थ्री स्पॉट येलो,  कॉमन क्रो,  कॉमनरक्रीनिग ब्राउन, तेनी कोस्टर, कॉमन सेलर, पिकॉक फॅन्सी, क्रीम्झन रोझ, लेमन पॅन्सी, डेनाईड इग फ्लाय, ब्लू टायगर, प्लेन टायगर, स्टाइक टायगर, कॉमन सार्जट, कॉमन लेफर्ड, रेड पियरी आदी प्रकारची फुलपाखरे आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

CM Devendra Fadnavis: गोरक्षणाच्या नावाखाली म्हशी पकडण्याची चौकशी करणार

Maharashtra Politics: सामान्यांच्या प्रश्नांवर विरोधकांना सूरच गवसला नाही

Sugarcane Bill Pending: दोन हजार कोटींची ऊस बिले तत्काळ द्यावीत

Irrigation Scam: सिंचन घोटाळ्याची चौकशी ८ वर्षांनंतरही अपूर्ण

Papaya Market: खानदेशात पपई आवक कमीच

SCROLL FOR NEXT