Bullock carts ran for the first time in Konkan after the ban was lifted 
मुख्य बातम्या

बंदी उठल्यानंतर कोकणात प्रथमच धावल्या बैलगाड्या

बंदी उठल्यानंतर कोकणात रविवारी (ता. ९) प्रथमच नाधवडे (ता. वैभववाडी) येथे बैलगाड्या धावल्या. उत्सुकता शिगेला पोहोचलेल्या या शर्यतीत देवरूखच्या समीर बने यांच्या बैलगाडीने बाजी मारली. पहिली शर्यत पाहण्यासाठी नाधवडे येथे हजारोंची गर्दी झाली होती.

टीम अॅग्रोवन

सिंधुदुर्गनगरी ः बंदी उठल्यानंतर कोकणात रविवारी (ता. ९) प्रथमच नाधवडे (ता. वैभववाडी) येथे बैलगाड्या धावल्या. उत्सुकता शिगेला पोहोचलेल्या या शर्यतीत देवरूखच्या समीर बने यांच्या बैलगाडीने बाजी मारली. पहिली शर्यत पाहण्यासाठी नाधवडे येथे हजारोंची गर्दी झाली होती.     बंड्या मांजरेकर मित्र मंडळ नाधवडेच्या वतीने नाधवडे येथे एमआयडीसीच्या मैदानात बैलगाडी शर्यतीचे आयोजन रविवारी सायकांळी करण्यात आले होते. बंदी उठल्यानंतर झालेल्या या स्पर्धेत रायगड, रत्नागिरी, कोल्हापूर, सांगली आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. स्पर्धा पाहण्यासाठी दुपारी बारा वाजल्यापासूनच मैदानावर गर्दी होण्यास सुरुवात झाली. कोरोनाचे सावट घोंघावत असताना ही स्पर्धा होत असल्यामुळे प्रशासनातील अनेक अधिकारी स्पर्धेच्या ठिकाणी होते. या स्पर्धेचे उद्‍घाटन दुपारी एक वाजता अतिरिक्त पोलिस अधीक्षक नितीन बगाटे यांच्या हस्ते झाले. या वेळी पोलिस निरीक्षक अतुल जाधव, पोलिस उपनिरीक्षक प्रवीण देसाई, पोलिस उपनिरीक्षक सूरज पाटील, सभापती अक्षता डाफळे, बंड्या मांजरेकर, सुधीर नकाशे आदी उपस्थित होते. अनेक वर्षांनी शर्यत होत असल्यामुळे लोकांमध्ये शर्यतविषयी प्रचंड कुतूहल होते. लोक मिळेल त्या जागेवरून शर्यत पाहत होते. शर्यतीत सहभागी झालेले स्पर्धक जीव ओतून बैलगाड्या पळवीत होते. कोण बाजी मारणार याची चर्चा मैदानाबाहेर जोरदार सुरू होती. एका पाठोपाठ एक बैलगाड्या धावत होत्या. अखेरची बैलगाडी सायकांळी साडेपाच वाजता धावली. त्या नंतर परीक्षकांनी स्पर्धेचा निकाल जाहीर केला. उत्कंठा शिगेला पोहोचलेल्या या स्पर्धेत देवरूख येथील समीर बने यांच्या बैलजोडीने प्रथम क्रमांक पटकाविला. त्यांना रोख रुपये ११ हजार १११ व चषक देऊन गौरविण्यात आले. द्वितीय क्रमांक द्वारकानाथ माने यांच्या बैलगाडीने मिळविला त्यांना रोख रुपये ७ हजार ७७७ रुपये व चषक देण्यात आला. तृतीय क्रमांकाचे मानकरी राजाराम चव्हाण यांची बैलजोडी ठरली. त्यांना ५ हजार ५५५ रुपये चषक देण्यात आला. उत्तेजनार्थ रोशन किरवे, देवरुख, उत्कृष्ट चालक सिरील फर्नांडिस, कुडाळ-घावनळे, उत्कृष्ट जोडी बळिराम पांचाळ चुनागोळवण, राजापूर यांना रोख बक्षीसे व चषक देऊन गौरविण्यात  आले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Mango Production : सातपुड्यात आंब्यांच्या चांगल्या उत्पादनाची अपेक्षा

Maharashtra Politics : फडणवीस यांच्या नावाची घोषणा लांबल्याने समर्थकांत अस्वस्थता

Co-Generation Subsidy : सात कारखान्यांच्या सहवीज प्रकल्पांना अनुदान नाकारले

Adam Master Retirement : माजी आमदार आडम मास्तरांची राजकारणातून निवृत्तीची घोषणा

Garlic Import : अफगाणिस्तानातून लसणाची आयात

SCROLL FOR NEXT