Bullock cart race Hearing on Wednesday? 
मुख्य बातम्या

बैलगाडा शर्यत  सुनावणी होणार बुधवारी?

बैलगाडा शर्यती पूर्ववत सुरू होण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात सोमवारी (ता. १५) होणारी सुनावणी तांत्रिक अडचणीमुळे पुढे ढकलण्यात आली आहे. बुधवारी (ता. १७) सुनावणी होण्याची शक्यता आहे.

टीम अॅग्रोवन

मंचर, जि. पुणे ः बैलगाडा शर्यती पूर्ववत सुरू होण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात सोमवारी (ता. १५) होणारी सुनावणी तांत्रिक अडचणीमुळे पुढे ढकलण्यात आली आहे. बुधवारी (ता. १७) सुनावणी होण्याची शक्यता आहे.  दरम्यान, राज्याचे पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार दिल्लीत दाखल झाले आहेत. त्यांच्यासमवेत पशुसंवर्धन खात्यातील उच्चपदस्थ अधिकारी, विधीज्ञ व बैलगाडा मालक आहेत. सुनावणीच्या पार्श्वभूमीवर प्रभावी युक्तिवाद होण्यासाठी ज्येष्ठ कायदेतज्ज्ञांबरोबर राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील व पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांनी संवाद साधला.  शनिवारी (ता.१३) सायंकाळी ज्येष्ठ विधीज्ञ शेखर नाफडे यांच्याशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील, मंत्री सुनील केदार, गृहराज्य मंत्री सतेज पाटील, खासदार डॉ. अमोल कोल्हे, राज्याचे पशुसंवर्धन आयुक्त सचिंद्र प्रताप सिंग यांनी चर्चा केली. या वेळी पशुसंवर्धन खात्याचे उपायुक्त डॉ. शैलेश केंडे, सहाय्यक आयुक्त डॉ. प्रशांत भड, अखिल भारतीय बैलगाडा संघटनेचे प्रतिनिधी संदीप बोदगे, रामकृष्ण टाकळकर सहभागी झाले होते.  रविवारी (ता. १४) नवी दिल्लीत मंत्री केदार यांनी ॲड. शेखर नाफडे यांची भेट घेऊन चर्चा केली. त्यानंतर ज्येष्ठ विधीज्ञ ॲड. मुकुल रोहोतगी यांच्यासोबत व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे चर्चा झाली. या वेळी झालेल्या चर्चेत मुंबईहून वळसे पाटील सहभागी झाले होते. या संदर्भाने सरकारी वकील ॲड. सचिन पाटील म्हणाले, ‘‘बैलगाडा शर्यती पुन्हा सुरू करण्यासाठी राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात अर्ज दिलेला आहे. सुनावणीची तयारी चालू आहे. त्याकरिता पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार दिल्लीत आले आहेत.’’ 

निकाल लावून घेऊ ः मंत्री केदार  चार वर्षांपासून बैलगाडा शर्यतीचा विषय सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. महाविकास आघाडी सरकार सत्तेवर आल्यानंतर या विषयाला चालना दिली आहे. सोमवारी (ता. १५) या विषयी सुनावणी होणार होती, पण तांत्रिक अडचणीमुळे सुनावणी पुढे ढकलली आहे, पण दोन दिवसांत सुनावणी होईल. दीड महिन्यांमध्ये निकाल लावून घेऊ, असा विश्वास पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांनी व्यक्त केला आहे.   

प्रतिक्रिया

बैलगाडा मालकांच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका. लवकरात लवकर न्याय मिळवून द्या. गेली अनेक वर्ष निर्णयाकडे बैलगाडाप्रेमी डोळे लावून बसले आहेत.  -बाळासाहेब आरुडे, बैलगाडा मालक, अवसरी खुर्द (ता. आंबेगाव)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Bhaskar Jadhav In Assembly: शेतकरी आत्महत्या, कृषी योजना आणि खोट्या आश्वासनांवरून जाधवांनी सरकारला धरले धारेवर

Group Farming : गटशेती हा शाश्‍वत शेतीचा प्रभावी पर्याय ठरू शकतो

Parbhani Rainfall : जून महिन्यात सरासरीहून कमी पाऊस

Farmer Aid Cancellation: नैसर्गिक आपत्तीच्या मदतीत कपात, शेतकऱ्यांची फसवणूक; वड्डेटीवारांचा सरकारवर निशाणा

Raj-Udhhav Unity : ठाकरे बंधूंची एकजूट पालिकेतही दिसावी

SCROLL FOR NEXT