`वडकबाळच्या खालच्या बाजूला ब्रीज बंधारा बांधा` 
मुख्य बातम्या

`वडकबाळच्या खालच्या बाजूला ब्रीज बंधारा बांधा`

सोलापूर : ‘‘दक्षिण सोलापूर तालुक्यातील वडकबाळ येथे असलेल्या बंधाऱ्याची उंची वाढविणे शक्य नसले, तरी बंधाऱ्याच्या खालच्या बाजूला नवीन ब्रीज कम बंधारा बांधा. त्याद्वारे पाणी साठवण करा,’’ अशा सूचना जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी दिल्या.

टीम अॅग्रोवन

सोलापूर : ‘‘दक्षिण सोलापूर तालुक्यातील वडकबाळ येथे असलेल्या बंधाऱ्याची उंची वाढविणे शक्य नसले, तरी बंधाऱ्याच्या खालच्या बाजूला नवीन ब्रीज कम बंधारा बांधा. त्याद्वारे पाणी साठवण करा,’’ अशा सूचना जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी दिल्या.

शासकीय विश्रामगृह येथे वडापूर, वडकबाळ बंधाऱ्याबाबतच्या आढावा बैठकीत पाटील बोलत होते. यावेळी आमदार यशवंत माने, संजय शिंदे, माजी आमदार राजन पाटील, दीपक साळुंखे-पाटील, माजी जि.प. अध्यक्ष बळिराम साठे, जलसंपदाचे अधीक्षक अभियंता जयंत शिंदे, कार्यकारी अभियंता एन.व्ही. जोशी, रमेश वाडकर, उजनी-डाव्या कालव्याचे रमेश क्षीरसागर आदी उपस्थित होते.

पाटील म्हणाले, ‘‘वडकबाळ बंधाऱ्याची उंची वाढविण्याची मागणी शेतकरी आणि लोकप्रतिनिधींनी केली. मात्र भूसंपादन, कृष्णा पाणी तंटा लवाद, अतिक्रमण यामुळे उंची वाढविणे शक्य नाही. त्याऐवजी नवीन छोटा बंधारा बांधून पुराचे पाणी साठवता येईल. जिल्ह्यातील सीना-भोगावती या जोडकालव्याबाबत सर्वेक्षण करा. वडापूर बंधाऱ्याबाबत निधीची कमतरता नाही. मध्यवर्ती चित्र संघटना नाशिक यांच्याकडून त्वरित डिझाईन मिळवून बंधाऱ्याचे काम चालू करा.’’

अधीक्षक अभियंता शिंदे यांनी वडकबाळ बंधारा, वडापूर बंधारा या बाबतची स्थिती मांडली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugarcane Dues : थकीत ऊस बिलासाठी १० ऑगस्टला ठिय्या आंदोलन

Crop Damage Compensation: सहा जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना दिलासा, शेतपिकांच्या नुकसानीसाठी ५ कोटी ५४ लाख मदत मंजूर

MAT Stay : भूवैज्ञानिक भरतीला ‘मॅट’कडून अंतरिम स्थगिती

Farmer Loan Waiver: आधार ई-केवायसीसाठी शुल्क आकारल्यास कठोर कारवाई : जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

Yavatmal Crop Insurance : यवतमाळच्या विम्यासंदर्भात सकारात्मक निर्णय घेऊ

SCROLL FOR NEXT