ब्रिटिशकालीन बंधाऱ्याला भगदाड; शेतीपिकांचे नुकसान 
ब्रिटिशकालीन बंधाऱ्याला भगदाड; शेतीपिकांचे नुकसान  
मुख्य बातम्या

ब्रिटिशकालीन बंधाऱ्याला भगदाड; शेतीपिकांचे नुकसान 

टीम अॅग्रोवन

नाशिक : मागील आठवड्यात पडलेल्या मुसळधार पावसामुळे ओढे नाले भरून वाहिले असून सर्व बंधारे भरले आहेत. सतत आठ दिवस पडत असलेल्या पावसामुळे कळवण, सुरगाणा तालुक्यांतील नद्यांना प्रचंड महापूर आला. या पुरामुळे देवळा तालुक्यातील विठेवाडी परिसरात असलेल्या बंधाऱ्याला भगदाड पडल्याने फुटला. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. 

विठेवाडी, सावकी दरम्यान असलेल्या जुण्या व कालबाह्य झालेल्या ब्रिटिशकालीन दगडी बंधाऱ्यांला दोन ते तीन ठिकाणी भगदाड पडले. पुराच्या पाण्याचा प्रवाह उत्तरेकडून दक्षिण दिशेकडे बंधाऱ्यात प्रवाहित झाल्याने अति दाब निर्माण झाला त्यामुळे बंधाऱ्याचा काही भाग खचला. यामुळे विठेवाडी, भऊर, सावकी, खामखेडा, लोहोणेर या गावांतील शेतकऱ्यांचे मोठे झाले आहे. यात प्रामुख्याने विठेवाडी येथील प्रगतिशील शेतकरी फुला जाधव व मोठाभाऊ जाधव यांच्या शेतात फुटलेल्या बंधाऱ्यांचे पाणी शिरल्याने १५० ते २०० फुटापर्यंत नदी काठचा भराव वाहून गेला. 

यासोबत काठावरील झाडे वाहून गेली. तसेच शेतांमध्ये पाणी शिरल्याने मका, ऊस, पपई या पिकांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेताशेजारील जुन्या बंधाऱ्यांची त्वरित दुरुस्ती करावी, अशी मागणी होत आहे. अन्यथा मोठा अनर्थ घडून पुराच्या पाण्यामुळे बंधारा फुटण्याचा मोठा धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. या बाबत जलसंपदा विभाग, महसूल विभाग यांनी याबाबत स्थानिक ठिकाणी पंचनामा करून झालेले नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी शेतकरी करत आहेत. 

जलसंपदा विभागाच्या अभियंत्यांनी त्वरित पाहणी करून बंधाऱ्याची दुरुस्ती करून बंधाऱ्यालगत २०० फूट संरक्षक भिंत बांधून द्यावी, अशी मागणी पालकमंत्री गिरीश महाजन, जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांच्याकडे बाधित शेतकरी फुला जाधव, मोठाभाऊ जाधव, दिनकर जाधव, कुबेर जाधव, नानाजी पवार, अभिमण पवार यांनी केली आहे, अशी माहिती कुबेर जाधव यांनी दिली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agriculture Update : गुणवत्तापूर्ण बियाणे, खते शेतकऱ्यांना द्या : इटनकर

Summer Weather : परभणीत दिवसाचा पारा ४३ अंशांवर

Water Stock : मराठवाड्यातील उपयुक्त पाणीसाठा ७ ते ८ टक्क्यांवर

Flower Rate : लग्नसराईमुळे फुलांच्या दरांत वाढ

Anandacha Shidha : आनंदाच्या शिध्याची प्रतीक्षा

SCROLL FOR NEXT