पुणे जिल्ह्यात दुष्काळामुळे पीक कर्जवाटपाला ब्रेक
पुणे जिल्ह्यात दुष्काळामुळे पीक कर्जवाटपाला ब्रेक 
मुख्य बातम्या

पुणे जिल्ह्यात दुष्काळामुळे पीक कर्जवाटपाला ब्रेक

टीम अॅग्रोवन

पुणे ः पुणे जिल्ह्यात आॅक्टोबर, नोव्हेंबरपासून पाणीटंचाईच्या झळा सुरू झाल्या आहेत. रब्बी हंगामातील पिकांकडे शेतकऱ्यांचा कल कमी झाला आहे. त्याचा परिणाम बँकेकडील पीक कर्जवाटपावरदेखील झाला आहे. रब्बी हंगामात शेतकऱ्यांनी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून अवघ्या ३६ हजार ६९० शेतकऱ्यांनी २०१ कोटी २१ लाख ६६ हजार रुपयांचे म्हणजेच २७ टक्के पीककर्ज घेतले आहे. पाणीटंचाईचा फटका पीक कर्जवाटपालादेखील बसला असून, पीक कर्जवाटपाला ब्रेक लागल्याचे दिसून येते.   

पावसाळ्यात कमी पाऊस झाल्यामुळे जमिनीत पुरेसा ओलावा राहिला नाही. त्यामुळे रब्बी हंगामात हरभरा, गहू, ज्वारी, करडई अशी विविध पिकांची पेरणी फारशी करता आली नाही. दरवर्षी शेतकरी पिकांची पेरणी करताना लागणाऱ्या निविष्ठा खरेदीसाठी काही वेळेस शेतकऱ्यांना अडचणी येतात. त्यामुळे बहुतांशी शेतकरी पीककर्जाचा आधार घेऊन रब्बीचे नियोजन करतात. यंदा पावसाळ्यात कमी झालेला पाऊस व परतीच्या पावसाने दिलेली हुलकावणी यामुळे रब्बी हंगामात अडचणीत आल्याने शेतकऱ्यांनी पीककर्ज घेण्याकडे पाठ फिरवली आहे. पुणे जिल्हा बँकेने चालू वर्षी रब्बी हंगामासाठी ७२७ कोटी ८९ लाख ७५ हजार रुपयांचे उद्दिष्ट ठेवले आहे. 

जिल्ह्यातील बहुतांशी शेतकऱ्यांना रब्बी हंगामातील पिकांची शाश्वती राहिलेली नाही. त्यामुळे कर्ज घेऊन ते पुन्हा परत फेडण्यापेक्षा कर्ज न घेतलेले बरे अशी भावना शेतकऱ्यांमध्ये दिसून येत आहे. यामुळे अनेक शेतकरी पीककर्ज घेण्याचे टाळत आहे.

गेल्या वर्षी २८ हजार ९१८ शेतकऱ्यांनी १२८ कोटी ४९ लाख रुपयांचे पीककर्ज घेतले होते. गेल्या वर्षीच्या तुलनेत चालू वर्षी रब्बी हंगामात पीककर्जाच्या वाटपात वाढ झाली असली तरी ४०-५० टक्क्यांपेक्षा अधिक वाटप होणार नसल्याची माहिती बँकेच्या सूत्रांनी दिली. पुणे जिल्हा सहकारी बँक तालुका व महत्त्वाच्या गाव पातळीवर असलेल्या २६६ शाखांमार्फत गाव पातळीवरील सुमारे १२८२ विविध कार्यकारी सहकारी सोसायटीना कर्जपुरवठा करून तो कर्जरूपाने सभासदांना देतात. सध्या बँकेकडून तीन लाखांपर्यंत कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांना शून्य टक्के व्याज दराने पीककर्जाचे वाटप केले जात आहे.

तालुकानिहाय झालेले पीककर्जाचे वाटप, रुपयांमध्ये 
तालुका  पीककर्जाची रक्कम 
आंबेगाव ३२ कोटी ६ लाख ४९ हजार रूपये 
बारामती १२ कोटी ८ लाख ८३ हजार 
भोर १६ कोटी १४ लाख २२ हजार 
दौंड १२ कोटी ४८ लाख ९२ हजार 
हवेली ५ कोटी ९१ लाख ३२ हजार 
इंदापूर १२ कोटी ८४ लाख १५ हजार 
जुन्नर ३३ कोटी १९ लाख १७ हजार 
खेड ३७ कोटी २९ लाख ४६ हजार 
मावळ १२ कोटी १० हजार ४० हजार 
मुळशी ६ कोटी १७ लाख २३ हजार 
पुरंदर ७ कोटी ९५ लाख २० हजार 
शिरूर १० कोटी ५२ लाख ८७ हजार 
वेल्हा २ कोटी ४३ लाख ४० हजार

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cotton Productivity : परभणी जिल्ह्यात कापूस रुईचा उतारा हेक्टरी ३ क्विंटल ९८ किलो

Water Scarcity : करकंब परिसरात द्राक्षबागांना टँकरने पाणी

Dam Water Stock : देशातील मोठी ७ धरणे कोरडी

Agriculture Irrigation : भामा-आसखेडच्या आवर्तनाची प्रतीक्षा

Ethanol Production : इथेनॉल मिश्रणाला बळ देण्याची अमेरिकेची तयारी

SCROLL FOR NEXT