बीटी कपाशीच्या फूल-पात्यांमध्ये अशा अळ्या दिसून येत अाहेत.
बीटी कपाशीच्या फूल-पात्यांमध्ये अशा अळ्या दिसून येत अाहेत.  
मुख्य बातम्या

तेल्हारा तालुक्यात बीटीवर बोंड अळी

टीम अॅग्रोवन

अकोला ः यंदाच्या हंगामात प्री-मॉन्सून लागवड झालेली कपाशी फूल-पाती अवस्थेत अाली असून, त्यावर गुलाबी बोंड अळीच्या प्रादुर्भावाची धास्ती शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाली अाहे. त्यातच तेल्हारा तालुक्यात काही ठिकाणी गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव दिसून अाला अाहे. कृषी यंत्रणा गेल्या दोन दिवसांपासून त्या भागात सर्वेक्षण, उपाययोजना तसेच जनजागृतीला लागली अाहे. तेल्हारा तालुक्यातील थार, कोठा या गावांत प्रादुर्भावाला सुरवात झाल्याचे समोर अाले अाहे.   

गेल्या हंगामात बोंड अळीच्या प्रादुर्भावाला तेल्हारा तालुक्यातूनच सुरवात झाली होती. या भागातून सर्वांत अाधी तक्रारी झाल्या होत्या. याही वर्षात बोंड अळीबाबत तेल्हारा तालुक्यातून पुन्हा एकदा सुरवात झाल्याचे समोर अाले अाहे.  कोठा येथील कैलास अहेरकर यांनी दोन एकरांत २१ मे रोजी कपाशीची लागवड केलेली अाहे. तर याच तालुक्यातील थार येथील राजू फोकमारे यांनी साडे पाच एकरात बीटी कपाशीची लागवड केलली असून, या दोघांच्याही शेतातील पिकावर गुलाबी अळी दिसून अाली. कपाशीला फुले, पात्या धरलेल्या असून त्यावर हा प्रादुर्भाव अाढळल्याने शेतकरी धास्तावले अाहे.  रखरखत्या उन्हापासून तसेच वन्य प्राण्यांपासून संरक्षण करीत शेतकऱ्यांनी कपाशी वाढवली. कपाशीच्या झाडांवर फुले, पात्या लागल्या अाहेत. दोन दिवसांपूर्वी या शेतातील कपाशीवर गुलाबी अळी पाती, फुलावर दिसून अाली. ही बोंड अळीच अाहे काय याबाबत शेतकऱ्यांना शंका अाल्याने त्यांनी कृषी विभागाला कळविले. ही माहिती मिळताच उपविभागीय अधिकारी अशोक कंडारकर व तालुक्यातील अधिकारी, कर्मचाऱी प्रादुर्भावग्रस्त गावांमध्ये दाखल झाले. दोन दिवसांपासून या भागात पाहणी केली जात अाहे.      बोंड अळी प्रादुर्भाव झाल्याचा प्रकार चर्चेत अाल्यानंतर शनिवारी (ता. २१) उपविभागीय कृषी अधिकारी अशोक कंडारकर, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या कीटकशास्त्र विभागाचे साहायक प्राध्यापक डॉ. जी. के. लांडे, डॉ. बाविस्कर व अन्य अधिकाऱ्यांच्या पथकाने तेल्हारा तालुक्यातील दहिगाव, थार येथे दोन शेतांना भेटी दिल्या.     निर्बंध असूनही बियाणे मिळालेच     बियाणे कंपन्यांना अावाहन करीत कृषी विभागाकडून कुणीही २० मे पर्यंत बियाणे बाजारात पाठवू नये असे निर्देश देण्यात अाले होते. काही कंपन्यांनी हे अादेश मानत २० मे नंतर पुरवठा सुरू केला. परंतु एवढे सारे निर्बंध असतानाही काही बीटी कंपन्यांचे बियाणे शेतकऱ्यांपर्यंत पोचविण्यात अाले. त्यामुळेच शेतकऱ्यांनी २० मे नंतर लगेचच मॉन्सून पूर्व कपाशीची लागवड केल्याची चर्चा होऊ लागली अाहे. शेतकऱ्यांना कोणत्या कंपनीने व कसे बियाणे पुरविले हे अाम्हाला शोधावे लागेल, असे कृषी विभागातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने ‘ॲग्रोवन’शी बोलताना सांगितले. प्रतिक्रिया  बीटी कपाशीवर बोंड अळीचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी या हंगामात २० मे पर्यंत बियाणे उपलब्ध करून दिले नव्हते. त्यानंतर ज्या शेतकऱ्यांनी २३ मे नंतर बियाणे उपलब्ध करून घेत प्री-मॉन्सून लागवड केली अशा तेल्हारा तालुक्यात थार, कोठा या गावांमध्ये कपाशीवर गुलाबी बोंड अळी दिसून अाली आहे. अाम्ही सर्वेक्षण सुरू केले आहे. अाम्ही या भागात तातडीने ग्रामसभा घेऊन त्यामध्ये बोंड अळीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी करावयाच्या उपाययोजनांबाबत तज्ज्ञांचे मार्गदर्शन शेतकऱ्यांना देणार अाहोत.  -अशोक कंडारकर, उपविभागीय कृषी अधिकारी, अकोट        

तेल्हारा तालुक्यात बोंड अळी अाल्याची माहिती मिळाली अाहे. अामच्या यंत्रणा तातडीने त्या भागात दाखल झाल्या असून, मार्गदर्शन करीत अाहेत. प्रादुर्भाव वाढू नये यासाठी उपाययोजना सांगितल्या जात आहेत. -राजेंद्र निकम, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, अकोला   

मी २२ मे रोजी कपाशीचा बीटी वाण लावला अाहे. त्याच्या प्रत्येक झाडावरील फुलांमध्ये अळीचा प्रादुर्भाव दिसून अाला अाहे.  - कैलास अहेरकर, कापूस उत्पादक शेतकरी

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Tata Tea Brand : ‘टाटा टी’कडून शेतकऱ्यांनी काय शिकायला हवे?

Indian Politics : पतंग, रेवड्या आणि वास्तव

Cotton Market : कापूस का काळवंडला?

Agriculture Commodity : मक्याच्या दरात घसरण; हळदीची पुन्हा उसळी

Kolhapur Market Rate : कोंथिबीर, पालेभाज्या २० रुपये पेंढी उष्म्यामुळे भाजी मंडईत आवक घटली

SCROLL FOR NEXT