Bhusar auction begins in Barshi market committee 
मुख्य बातम्या

बार्शी बाजार समितीमध्ये भुसारचे लिलाव सुरू 

सोलापूर ः कोरोनामुळे जिल्ह्यातील बहुतेक सर्व बाजार समितीतील लिलाव बंद आहेत. पण कोरोनाला रोखण्यासाठी सोशल डिस्टन्सिंगची काळजी घेत आणि बाजार समिती आवारातील गर्दी टाळण्यासाठी बार्शी कृषी उत्पन्न बाजार समितीने मुख्य बाजारासह वैराग उपबाजारमध्ये भुसार शेतमाल लिलावासाठी काही ठरावीक दिवसांचे नियोजन केले आहे.

टीम अॅग्रोवन

सोलापूर ः कोरोनामुळे जिल्ह्यातील बहुतेक सर्व बाजार समितीतील लिलाव बंद आहेत. पण कोरोनाला रोखण्यासाठी सोशल डिस्टन्सिंगची काळजी घेत आणि बाजार समिती आवारातील गर्दी टाळण्यासाठी बार्शी कृषी उत्पन्न बाजार समितीने मुख्य बाजारासह वैराग उपबाजारमध्ये भुसार शेतमाल लिलावासाठी काही ठरावीक दिवसांचे नियोजन केले आहे. 

बार्शी बाजार समितीचे सभापती, व्यापारी संघटना अध्यक्ष, शेतकरी प्रतिनिधी, कामगार संघटना अध्यक्ष, बाजार समितीचे सचिव यांच्या बैठकीत यासंबंधीचा निर्णय नुकताच घेण्यात आला. त्यानुसार सकाळी ८ ते २ या वेळेमध्ये ठरलेल्या वेळापत्रकानुसार सदर शेतमालाची विक्री बाजार समितीमध्ये होणार आहे. 

बाजार समितीमध्ये तुळजापूर रोड गेट क्र. १ मधून प्रवेश तर नाळे प्लॉट रोड गेट क्र. ३ मधून बाहेर पडता येईल. प्रत्येक वाहनाचा चालक व सोबत १ मालक शेतकरी यांना प्रवेश दिला जाणार आहे. शेतमाल दुकानामध्ये उतरल्यानंतर बाजार समितीच्या पार्किंगच्या जागेमध्ये रिकामे वाहने लावण्याचे सूचित करण्यात आले आहे. ज्या शेतमालाची विक्री करावयाची ठरले आहे. त्याच दिवशी तो शेतमाल उतरून घेतला जाणार आहे. 

ज्वारी क्लिनिंग मशीनवरील कामगार, फेडरेशन तूर खरेदी व बारदाना शिलाई कामगार यांना सकाळी ८ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत वेळ देण्यात आली आहे. आडत्या, व्यापारी यांनी सदर नियमांचे पालन न केल्यास विशिष्ट कालावधीसाठी परवाना रद्द केला जाईल, असा इशारा देण्यात आला आहे. सोशल डिस्टन्सिंगचे पालन करताना मास्क व सॅनिटायझरचा वापर करावा, अशीही सूचना त्यांना करण्यात आली आहे. 

असे असेल वेळापत्रक  सोमवार आणि शनिवारी तूर, सोयाबीन, मूग, उडिदाची खरेदी होईल. मंगळवार आणि गुरुवारी ज्वारी, बुधवार आणि शुक्रवारी हरभरा शेंगा, हळद यांची खरेदी होईल. यानुसारच शेतकऱ्यांनी शेतमाल आणावा आणि व्यापाऱ्यांनी तो खरेदी करावा, असे आवाहन बाजार समितीचे सचिव तुकाराम जगदाळे यांनी केले आहे. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shaktipeeth Expressway: शेतकऱ्यांच्या संसारावर वरवंटा फिरवणारा शक्तिपीठ महामार्ग होऊ देणार नाही- राजू शेट्टी

Superintendent Agriculture Officer: लातूरच्या ‘एसएओ’पदी राजेंद्र कदम यांची नियुक्ती

Road Project: मोहोळ-तांदूळवाडी मार्ग मंजुरीच्या अंतिम टप्प्यात

Political Controversy: गाळे बांधकामाबाबतीत आरोप राजकीय हेतूने प्रेरित

Maharashtra Farmer Issues: पीक विमा, अतिवृष्टी सरकारसाठी अडचणीचे

SCROLL FOR NEXT