भेंडवळ मांडणी
भेंडवळ मांडणी 
मुख्य बातम्या

भेंडवळची घटमांडणी मंगळवारी होणार, बुधवारी येणार अंदाज

टीम अॅग्रोवन

बुलडाणा  आजच्या काळातही शेतकऱ्यांची उत्सुकता बनलेली भेंडवळ येथील घटमांडणी या वर्षी अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर मंगळवारी (ता. ७) सायंकाळी केली जाणार आहे. जळगाव जामोद तालुक्यातील भेंडवळ येथे ही घटमांडणी तीनशे वर्षांपेक्षा अधिक काळापासून केली जात आहे.  दरवर्षी हंगामाच्या दृष्टीने पीक, पाणी, भाव, सामाजिक, आर्थिक, राजकीय परिस्थितींबाबत या घटमांडणीद्वारे अंदाज व्यक्त केले जातात. दरवर्षी ही मांडणी पाहण्यासाठी राज्याच्या विविध भागांतून शेतकरी येत असतात. या वर्षी अक्षय तृतीयेच्या (मंगळवारी) सायंकाळी भेंडवळ गावाला लागून असलेल्या शेतात एका गोल घटात ही मांडणी केली जात आहे. त्यानंतर दुसऱ्या दिवशी (बुधवारी, ता. ८) सूर्योदयाच्या वेळी या मांडणीची पाहणी करून चंद्रभान महाराज वाघ यांचे वंशज पुंजाजी महाराज आणि शारंगधर महाराज वाघ हे भाकिते जाहीर करतील. मांडणीच्या घटामध्ये गहू, ज्वारी, तूर, उडीद, मूग, हरभरा, जवस, तीळ, भादली बाजरी, तांदूळ, अंबाडी, सरकी, वाटाणा, मसूर, करडी असे १८ प्रकारचे धान्य ठेवण्यात येतात. तसेच, घटाच्या मध्यभागी मातीची ढेकळे, त्यावर पाण्याने भरलेली घागर, त्यावर पानसुपारी, पुरी, पापड, खांडोळी, कुरडई हे खाद्यपदार्थ ठेवले जातात. रात्रभर कोणीही या ठिकाणी थांबत नाही. नंतर दुसऱ्या दिवशी सूर्योदयाच्यावेळेस पाहणी करून प्रत्येक गोष्टीचे अंदाज दिले जातील. याच ठिकाणी गुढीपाडव्याला गावातील हनुमान मंदिरात पारावरची मांडणी केली जाते. या मांडणीचेही अंदाज या मुख्य मांडणीच्यावेळी जाहीर केले जातात.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cotton Productivity : परभणी जिल्ह्यात कापूस रुईचा उतारा हेक्टरी ३ क्विंटल ९८ किलो

Water Scarcity : करकंब परिसरात द्राक्षबागांना टँकरने पाणी

Dam Water Stock : देशातील मोठी ७ धरणे कोरडी

Agriculture Irrigation : भामा-आसखेडच्या आवर्तनाची प्रतीक्षा

Ethanol Production : इथेनॉल मिश्रणाला बळ देण्याची अमेरिकेची तयारी

SCROLL FOR NEXT