Bhalerao brings farmers' poem to the world: Pathare 
मुख्य बातम्या

भालेराव यांनी शेतकऱ्यांची कविता जगासमोर आणली : पठारे

परभणी : ‘‘इंद्रजित भालेराव लोकप्रिय कवी आहेत. ते केवळ परभणीचेच नव्हे, तर महाराष्ट्राचे कवी आहेत. त्यांनी भाषेची मशागत करून शेतकऱ्यांची कविता जगासमोर आणली. पाखरांचे, प्राण्यांचे नाद, लय त्यांच्या कवितेत आली आहे. कवितेचा हा सांस्कृतिक ठेवा महत्त्वाचा आहे,’’ असे प्रतिपादन ज्येष्ठ कादंबरीकार रंगनाथ पठारे यांनी परभणी येथे बुधवारी (ता.२) केले.

टीम अॅग्रोवन

परभणी : ‘‘इंद्रजित भालेराव लोकप्रिय कवी आहेत. ते केवळ परभणीचेच नव्हे, तर महाराष्ट्राचे कवी आहेत. त्यांनी भाषेची मशागत करून शेतकऱ्यांची कविता जगासमोर आणली. पाखरांचे, प्राण्यांचे नाद, लय त्यांच्या कवितेत आली आहे. कवितेचा हा सांस्कृतिक ठेवा महत्त्वाचा आहे,’’ असे प्रतिपादन ज्येष्ठ कादंबरीकार रंगनाथ पठारे यांनी परभणी येथे बुधवारी (ता.२) केले.

विद्यार्थ्यांतर्फे कवी इंद्रजित भालेराव ‘कृतज्ञता सोहळा’आयोजित करण्यात आला. अध्यक्षस्थानी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. अशोक ढवण होते. गया भालेराव, खासदार संजय जाधव उपस्थित होते.

पठारे म्हणाले, ‘‘कोल्हापूर नंतर परभणीत सांस्कृतिक पायाभरणीचा प्रयत्न भालेराव यांनी केला. त्यांच्या कवितेत शेतकरी ऐवजी ‘कुणबी’ हा शब्द आयोजिलेला आहे. तो अत्यंत महत्त्वाचा आहे. बी. रघुनाथ यांच्यानंतर मोठे कवी म्हणून भालेराव महत्त्वाचे आहेत.’’

भालेराव म्हणाले, ‘‘शेती आणि शेतकऱ्यांची कविता लिहिली. कृषी विद्यापीठासाठी गीत लेखन केले, याचा आनंद आहे. विद्यार्थी आपापल्या क्षेत्रात नावलौकिकास पात्र ठरले, हीच मोठी आयुष्यातील समाधानाची गोष्ट आहे.’’

डॉ. ढवण म्हणाले, ‘‘भालेराव यांची ‘माझा बाप’ ही विलक्षण कविता प्रेरणादायी आहे.’’ सूत्रसंचालन सुनील तुरुकमाने यांनी केले. आभार बालासाहेब जाधव यांनी मानले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

E Crop Registration: अमरावतीत ७९ टक्के शेतकऱ्यांचा ऑनलाइन पीक पेऱ्याला खो

Jal Jeevan Mission: जलजीवन योजनेचे काम रखडल्याने टंचाईच्या झळा

Pesticide Company Inspection: ‘ड’ वर्गातील कीडनाशक कंपन्या रडारवर

LPG Cylinder Crisis: एलपीजी सिलिंडरमधून मिळणार केवळ १० किलो गॅस

Milk Adulteration MCOCA Action: दूध भेसळखोरांवर ‘मकोका’चा बडगा

SCROLL FOR NEXT