खानदेशात कांदेबाग केळीची लागवड पूर्ण; यंदा ११०० हेक्टरने वाढ
खानदेशात कांदेबाग केळीची लागवड पूर्ण; यंदा ११०० हेक्टरने वाढ 
मुख्य बातम्या

खानदेशात कांदेबाग केळीची लागवड पूर्ण; यंदा ११०० हेक्टरने वाढ

टीम अॅग्रोवन

जळगाव : खानदेशात कांदेबाग केळीची लागवड पूर्ण झाली आहे. क्षेत्रात सुमारे ११०० हेक्टरने यंदा वाढ झाली आहे. कांदेबाग केळीची लागवड ऑक्टोबर किंवा १५ ते २० नोव्हेंबरपर्यंत पूर्ण होते. परंतु यंदा लागवड अतिपावसाने सुमारे २० ते २५ दिवस लांबली. काढणी मात्र जोमात झाली. दरही गेल्या वर्षीच्या तुलनेत टिकून होते. यामुळे केळीची लागवड यंदा सुमारे ११०० हेक्टरने वाढली. चोपडा तालुक्यात लागवड सुमारे ६०० हेक्टरने वाढली आहे. तर उर्वरित लागवड यावल, जळगाव व पाचोरा भागात वाढली आहे.  चोपडा तालुक्यात सुमारे साडेचार हजार हेक्टरवर कांदेबाग केळी आहे. जळगाव तालुक्यात १३०० हेक्टर, पाचोरा भागात सुमारे ७०० ते ८०० हेक्टरवर कांदेबाग केळी आहे. धुळ्यातील शिरपूर तालुक्यातही कांदेबाग केळी लागवड वाढली आहे. या तालुक्यातही सुमारे २०० ते २५० हेक्टरने लागवड अधिक झाली आहे. केळी लागवडीसाठी शेतकऱ्यांनी कंदांना पसंती दिली. उतिसंवर्धित रोपांच्या बागांमधील कंदांसह आंबेमोहोर, महालकक्ष्मी, बसराई आदी केळी वाणांच्या कंदांची लागवड झाली आहे. मध्यंतरी थंडी कमी असल्याने केळी कंदांची उगवण बऱ्यापैकी झाली. परंतु पुढे जशी थंडी वाढेल, तशी केळीची वाढ व इतर बाबींसाठी शेतकऱ्यांना काटेकोर नियोजन करावे लागेल.

नदीकाठच्या क्षेत्रात लागवड कांदेबाग केळीची लागवड खानदेशात प्रामुख्याने तापी, गिरणा, अनेर नद्यांच्या क्षेत्रात केली जाते. यंदाही याच भागांत लागवड आहे. यावल तालुक्यातील पूर्व भाग, रावेर, मुक्ताईनगर भागात मात्र कांदेबाग केळीची अपवादाने लागवड झाली आहे, अशी माहिती मिळाली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cotton Productivity : परभणी जिल्ह्यात कापूस रुईचा उतारा हेक्टरी ३ क्विंटल ९८ किलो

Water Scarcity : करकंब परिसरात द्राक्षबागांना टँकरने पाणी

Dam Water Stock : देशातील मोठी ७ धरणे कोरडी

Agriculture Irrigation : भामा-आसखेडच्या आवर्तनाची प्रतीक्षा

Ethanol Production : इथेनॉल मिश्रणाला बळ देण्याची अमेरिकेची तयारी

SCROLL FOR NEXT