Background in Sindhudurg, public life disrupted
Background in Sindhudurg, public life disrupted 
मुख्य बातम्या

सिंधुदुर्गात पूरस्थिती, जनजीवन विस्कळीत 

टीम अॅग्रोवन

सिंधुदुर्ग ः जिल्ह्यात गेल्या दोन ते तीन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे. अनेक घरांना पुराच्या पाण्याने वेढले असून अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. काही गावातील शेती पाण्याखाली गेली आहे. जिल्ह्यातील अनेक प्रमुख मार्गावरील वाहतूक ठप्प झाली असून जनजीवन विस्कळीत झाले आहे.  

वादळीवारे वाहत असल्यामुळे अनेक घरांवर झाडे कोसळणे, वीजखांब उन्मळून पडण्याचे प्रकार घडले आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेल्या दोन ते तीन दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. या पावसामुळे नद्यांच्या पाणीपातळीत वाढ झाली होती. त्यातच मंगळवारी रात्रभर जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे जिल्ह्यात पूरस्थिती निर्माण झाली आहे. जिल्ह्यातील बहुतांशी नद्यांनी पुररेषा ओलांडली आहे. त्यामुळे अनेक घरांमध्ये, वस्तीमध्ये पुराचे पाणी शिरले आहे. खारेपाटण (ता. कणकवली) बाजारपेठेला पुराच्या पाण्याने वेढले आहे. या भागातील भातशेती पुराच्या पाण्याखाली गेली आहे. 

काही घरांमध्ये पुराचे पाणी घुसले असून तेथील नागरिकांना इतरत्र हलविण्यात आले आहे. कुडाळ तालुक्यातील आंबेडकर नगरला पुराच्या पाण्याने वेढले आहे. त्यामुळे लोकांमध्ये भितीचे वातावरण आहे. पुराचे पाणी वाढत असल्यामुळे तेथील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात येणार आहे. कणकवली तालुक्यातील गड आणि जानवली या दोन्ही नद्यांचे पाणी पात्राबाहेरून वाहू लागले आहे. त्यामुळे शहरात नदीलगत असलेल्या अनेक घरांमध्ये पाणी घुसले आहे. 

तळेरे-कोल्हापूर या राष्ट्रीय महामार्गावरील करूळ घाटात दरड कोसळली असून याच मार्गावरील मांडकुली (ता. गगनबावडा) पुराचे पाणी रस्त्यावर आल्यामुळे जिल्ह्याचा कोल्हापुरशी सपंर्क तुटला आहे. वेंगुर्ले, वैभववाडी, कुडाळ, सांवतवाडी या तालुक्यांमध्ये वादळ आणि मुसळधार पावसामुळे अनेक घरांची पडझड झाली आहे. जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये वीजखांब आणि वीजवाहिन्या तुटून पडल्यामुळे मंगळवारी रात्रीपासून वीज पुरवठा खंडीत आहे. 

जिल्ह्यातील नद्या, नाल्यांचे पाणी पात्राबाहेरून वाहत असल्यामुळे लगतच्या भातशेतीतून पुराचे पाणी वाहत आहे. त्यामुळे शेतीचे मोठे नुकसान होत असल्याचे जिल्ह्यात चित्र आहे. आज तिसऱ्या दिवशी पावसाचा जोर कायम असून सायंकाळपर्यंत पूरस्थिती आणखी गंभीर होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Accident Insurance Scheme : अपघात विमा योजनेतून ४५० शेतकरी कुटुंबांना मदत

Banana Sunburn : उन्हाच्या तीव्रतेमुळे जळताहेत केळीची रोपे

Summer Heat : मालेगावात वैशाखाआधीच वणवा

Adulterated Milk : भेसळयुक्त दूध रोखण्यासाठी उपाययोजना कराव्यात

Water Scarcity : कळंबा परिसरात पाण्याचा प्रश्‍न गंभीर

SCROLL FOR NEXT