Awareness campaign started in 150 villages to prevent floods 
मुख्य बातम्या

वणवा रोखण्यासाठी १५० गावांत जनजागृती सुरू

जिल्हा नियोजन समितीने पर्यावरण तज्ज्ञांच्या मदतीने बारामती, पुरंदर, भोर, वेल्हे या तालुक्यांत वनवणवा नियंत्रित जनजागृतीसाठी पथदर्शी मोहीम हाती घेतली आहे.

टीम अॅग्रोवन

पुणे : तापमानवाढ आणि मानवी कारणामुळे अनेकदा जंगलाना आग लागून मोठे नुकसान होते. परिणामी स्थानिक जैवविविधता नष्ट होते. याबाबत स्थानिक नागरिकांमध्ये जनजागृती होणे आवश्यक आहे. यासाठी जिल्हा नियोजन समितीने पर्यावरण तज्ज्ञांच्या मदतीने बारामती, पुरंदर, भोर, वेल्हे या तालुक्यांत वनवणवा नियंत्रित जनजागृतीसाठी पथदर्शी मोहीम हाती घेतली आहे. चित्ररथ आणि एलईडी वाहन जिल्ह्यातील वनक्षेत्र अधिक असलेल्या भागातील प्रत्येकी १५० पेक्षा अधिक गावांतून फिरणार आहे.  जिल्हा वार्षिक योजना २०२१-२२ अंतर्गत नावीन्यपूर्ण योजनेतून ‘वनवणवा नियंत्रण व जैवविविधता’ या संकल्पनेवार आधारीत जनजागृतीसाठी तयार करण्यात आलेल्या चित्ररथ आणि एलईडी वाहनाचे उद्घाटन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते रविवारी (ता.१३) करण्यात आले. या वेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निर्मला पानसरे, कृषी आयुक्त धीरज कुमार, जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख, मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, पर्यावरण तज्ज्ञ डॉ.महेश गायकवाड, जिल्हा माहिती अधिकारी डॉ.किरण मोघे, माहिती अधिकारी सचिन गाढवे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी ज्ञानेश्वर बोठे, आत्माचे प्रकल्प संचालक राजेंद्र साबळे, माहिती सहायक गणेश फुंदे, संदीप राठोड आदी उपस्थित होते.  संकल्पनेशी संबंधित ५ विविध विषयांवर लघुचित्रफिती तयार करण्यात आल्या आहे. त्यात ज्येष्ठ पर्यावरणतज्ज्ञ मारुती चितमपल्ली, ज्येष्ठ अभिनेते सयाजी शिंदे, मकरंद अनासपुरे, डॉ.महेश गायकवाड यांच्या संदेशाचादेखील समावेश करण्यात आला आहे. या चित्रफितीनंतर शाळांमधूनदेखील दाखविण्यात येणार आहेत. पर्यावरणाचा संदेश देण्यासाठी राबविण्यात येणारा हा उपक्रम स्तुत्य असून जिल्हा माहिती कार्यालयाच्या सर्व उपक्रमांना सहकार्य करण्यात येईल, असे या वेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.   

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Monsoon Rain Alert: पावसाचा जोर वाढण्याची शक्यता; विदर्भ, मराठवाड्यात काही ठिकाणी मुसळधारेचा अंदाज

Protest On NAFED: कांदा प्रश्नावर नाशिकमध्ये काँग्रेसचा नाफेडवर मोर्चा; पारदर्शक खरेदीची मागणी

Crop Loss: केळी, कांदा नुकसानीची भरपाई मिळण्याची प्रतीक्षा

Dry Rivers: खानदेशात अनेक नद्या कोरड्या

Urad Crop Loss: कमी पावसामुळे जळगाव जिल्ह्यात उडीद पिकाला फटका

SCROLL FOR NEXT