चटका वाढणार; उष्ण लाटाही येणार
चटका वाढणार; उष्ण लाटाही येणार 
मुख्य बातम्या

चटका वाढणार; उष्ण लाटाही येणार

टीम अॅग्रोवन

पुणे : देशात मार्च ते मे या तीन महिन्यांच्या कालावधीत सामान्य तापमानात एक अंश सेल्सिअसपेक्षा जास्त वाढ होण्याचा अंदाज हवामान विभागाने प्रसिद्ध केलेल्या अहवालात व्यक्त केला आहे. संपूर्ण देशभरात सामान्य तापमानापेक्षा अधिक तापमानवाढीचा अंदाज असला, तरी या महिन्यांमध्ये पूर्व आणि मध्य भारत सर्वाधिक उष्ण असण्याची शक्यता आहे.  हरियाना, पंजाब आणि राजस्थानसह दिल्लीमध्ये सरासरी तापमानापेक्षा दीड अंश सेल्सिअस अधिक तापमानाची वाढ झाली आहे. तथापि, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये कमाल तापमानात वाढ अपेक्षित आहे. यंदा जम्मू-काश्मीर, पंजाब, एचसीडी (हरियाना, चंडीगड व दिल्ली), हिमाचल प्रदेश, पूर्व व पश्‍चिम राजस्थान, उत्तराखंड, पूर्व आणि पश्‍चिम उत्तर प्रदेश, पूर्व आणि पश्‍चिम मध्य प्रदेश, बिहार, झारखंड, छत्तीसगड, विदर्भ, गुजरात आणि अरुणाचल प्रदेश या राज्यांत कमाल तापमान सामान्यपेक्षा १ अंश सेल्सिअसपेक्षा अधिक असण्याची शक्यता आहे. केरळ, तमिळनाडू, दक्षिण आंतिक कर्नाटक आणि रॉयलसीमा या ठिकाणी ०.५ अंश सेल्सिअसपेक्षा जास्त तापमान असण्याची शक्यता आहे. उर्वरित उपविभागांमध्ये ०.५ अंश सेल्सिअस आणि १ अंश सेल्सिअसदरम्यान अधिक तापमान असण्याची शक्यता असते. दोन डोंगराळ राज्यांमध्ये सरासरी तापमान सामान्यपेक्षा जास्त २.३ अंश जास्त असू शकते.

देशभरात या तीन महिन्यांतील किमान तापमानातही १ अंश सेल्सिअसने वाढ होण्याचा अंदाज आहे. साधारणत: जम्मू- काश्‍मरी, पंजाब, हरियाना-चंडीगड-दिल्ली, हिमाचल प्रदेश, पूर्व-पश्‍चिम राजस्थान, उत्तराखंड, पूर्व-पश्‍चिम उत्तर प्रदेश, पश्‍चिम मध्य प्रदेश अाणि अरुणाचल प्रदेश येथे १ अंशापेक्षा अधिक तापमान वाढ होण्याचा अंदाज आहे. तमिळनाडू, उत्तर आणि दक्षिण कर्नाटक, रॉयलसीमा, आंध्र प्रदेश किनारपट्टी, ओडिशा, नागालँड, मणिपूर, मिझोराम आणि त्रिपुरा या भागांत ०.५ अंश, उर्वरित भागात ०.५ ते १ अंशादरम्यान किमान तापमानात वाढ होण्याचे संकेत आहेत.

मार्च ते मे महिन्यांदरम्यान उष्णतेच्या लाट क्षेत्रात ''ग्रीड पॉइंट’ कमाल तापमानापेक्षा ५२ टक्के राहण्याची शक्यता असून, सामान्य तापमानापेक्षा ते अधिक असेल. उष्णतेच्या लाटेची शक्यता असलेले भागांमध्ये पंजाब, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, दिल्ली, हरियाना, राजस्थान, उत्तर प्रदेश, गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगड, बिहार, उत्तराखंड, पश्‍चिम बंगाल, ओडिशा आणि तेलंगण या राज्यांसह हवामान उपविभाग असलेल्या मराठवाडा, विदर्भ, मध्य महाराष्ट्र आणि आंध्र प्रदेश किनारपट्टी यांचा समावेश आहे.

दीर्घकालीन अंदाज विभागातील प्रमुख शास्त्रज्ञ डी. शिवानंद पई म्हणाले, ‘‘मार्च ते मे या कालावधीत अधिक संकेत नसल्याने, संभाव्य तापमानवाढ ही जागतिक तापमानवाढीच्या परिणामस्वरूप असू शकते. अलीकडच्या वर्षांत बहुतांश आंतरराष्ट्रीय हवामान मॉडेल जगाच्या बऱ्याच भागांमध्ये वाढलेले तापमान दर्शवितात, हे जागतिक तापमान वाढीचे लक्षण असू शकेल.’’ तथापि, मॉन्सून मॉडेलनुसार वसंत ऋतूपर्यंत ला निनाची स्थिती सामान्य राहण्याची शक्यता असून, त्यानंतर ती हळूहळू कमी होईल. यंदाचा मॉन्सून सामान्य राहण्याची चिन्हे सध्या तरी आहेत.

   हवामान विभागाचा इशारा...

  •  मार्च ते जुलैदरम्यान तापमान, उष्णतेच्या लाटा
  •  मानवी आरोग्याचे प्रश्‍न निर्माण होण्याची शक्यता
  •  जलसाठ्यांच्या बाष्पीभवनाचा वेग वाढेल 
  •  ऊर्जानिमितीवरही परिणाम होण्याची शक्यता
  •  हरितगृह वायूच्या प्रमाणात वाढ होणार
  •  समुद्रातील पाण्याच्या पृष्ठभागाचे तापमान वाढणार
  •  फळबागा, भाजीपाला आणि उन्हाळी पिकांनाही फटका बसणार फळपिकांची काळजी घेणे गरजेचे आहे. त्यासाठी ६ ते ८ टक्के केव्होलिन अर्थात १०० लिटर पाण्यात ८ ते १० किलो केव्होलिन पावडर मिसळून फवारणी केल्यास पिकांच्या पानांमधून होणाऱ्या बाष्पीभवनाचा वेग कमी होईल. या पिकातील पाणी कमी न होण्यास मदत होईल. फळपिकांना मलचिंंग करावे लागेल. ठिबक सिंचनाचा वापर करून पाण्याची बचत करावी. भाजीपाला पिकांना शेडनेटचा वापर करावा. - डॉ. रामचंद्र साबळे, ज्येष्ठ कृषी हवामान तज्ज्ञ 
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Maharashtra Rain : सोमवारपासून पुन्हा पावसाचा अंदाज; राज्यातील बहुतांशी भागात ऊन आणि उकाडा वाढण्याची शक्यता

    Kharif Planning Review Meeting : आठ लाख हेक्टरवर खरीप पेरण्यांचे नियोजन

    Banana Farming Management : सिंचन, खत व्यवस्थापनावर भर

    Kokan Development : कोकणातील आंबा पिकासाठी स्वतंत्र मंडळ स्थापणार

    Indian Agriculture : शेतातील सेंद्रिय पदार्थाचे पुनर्चक्रीकरण

    SCROLL FOR NEXT